Headlines

KGF Chapter 2 Review : रॉकी भाईची धमाकेदार एन्ट्री, संजय दत्त, रवीना टंडनमुळे सिनेमा अधिक दमदार

[ad_1]

KGF Chapter 2 Movie Review : देशाच्या पंतप्रधान विचारतात, तुमच्याकडे खूप सोने आहे? यावर उत्तर म्हणून रॉकी म्हणतो ‘होय… तुम्हाला देशाचे कर्ज फेडायचे असेल तर सांगा’. असे वाचून तुम्हाला गंमत वाटेल, पण जेव्हा हा सीन सिनेमागृहात सुरू असतो, तेव्हा मात्र त्यावर शिट्ट्या वाजतात. रॉकी भाई, रॉकी भाई च्या घोषणा दिल्या जात आहेत. KGF Chapter 2′ मध्ये नायकाची एंट्री, प्रत्येक संवाद, प्रत्येक कृतीवर टाळ्या वाजल्या आहेत.

यात सर्वात मनोरंजक काय असेल तर ते म्हणजे. तो कोणताही मोठी बॉलिवूड अभिनेता नाही तर दक्षिणेचा हिरो आहे. देशाच्या राजधानीत राहणाऱ्या तरुणांना आधी हा अभिनेता माहित देखील नसेल. पण पहिला भाग आल्यानंतर सिनेमाच्या दुसऱ्या भागाची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. अभिनेता यश याला ही प्रचंड लोकप्रियता मिळाली.

संजय दत्त आणि रवीना टंडन या आणखी दोन नावांची घोषणा झाल्यावर चित्रपटाची प्रतीक्षा आणखीनच वाढली. तसंच तिसरं नाव प्रकाश राजचं होतं, ज्यामुळे चित्रपट अधिक दमदार झाला. ही कथाही अशा पातळीवर नेण्यात आली की थेट देशाच्या पंतप्रधानांनाही त्याचा भाग बनवण्यात आले.

प्रेक्षकांची आवड टिकवून ठेवणाऱ्या संवादांवर चांगले काम केले आहे. अनेक हिट डायलॉग यात पाहायला मिळतील. KGF Chapter 2 मध्ये गरुडला मारल्यानंतर रॉकी KGF चा सुलतान बनतो आणि अनेक नवीन खाणींमधून खूप वेगाने सोने काढू लागतो.

गरुडाच्या विरोधात असलेले सगळे त्याच्या ही विरोधात जातात. पण एकाला मारल्यानंतर सगळ्यांमध्ये दहशत निर्माण होते. रीनाला तो केजीएफमध्येच ठेवतो. पण नंतर रॉकीला झटका देतो ते गरुडाचा भाऊ अधीरा म्हणजेच संजय दत्त (Sanjay Dutt). शानदार एन्ट्री आणि गेटअप सोबत संजय दत्त रॉकीसह त्यांच्या फॅन्सला ही दहशतीत टाकतो.

रॉकीचं संपूर्ण साम्राज्य नष्ट केलं जातं. पण रॉकीला जिंवत सोडणं त्यांच्यासाठी नंतर डोकेदुखी ठरते. रॉकीची पुन्हा धमाकेदार वापसी होते. नंतर देशाची पंतप्रधान बनते रमिका सेन म्हणजेच रवीना टंडन. सीबीआय डायरेक्टर तिला सांगतो की, सर्वात मोठा क्रिमिनल रॉकी भाई आहे. त्याला संपवाव लागेल. रॉकीची पीएम ऑफिसमध्ये एन्ट्री होते.र

रवीना आणि संजय दत्त दोघांचा रोल दमदार आहे. रॉकीचा रोल यशने खूप चांगल्या प्रकारे साकारला आहे.

कलाकार : यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज, अनंत नाग, अच्युत कुमार, राव रमेश, अर्चना जॉयस इ.

दिग्दर्शक : प्रशांत नील

स्टार रेटिंग: 4



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *