माझ्या विरोधात ज्यांनी भाषणे केली ते पराभूत झाले – केसरकरसावंतवाडी : सावंतवाडीमध्ये येऊन माझ्या विरोधात यापूर्वी ज्यांनी ज्यांनी भाषणे केली ते पराभूत झाले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्या विरोधात सभेत बोलणाऱ्या विरोधात मी सावंतवाडीत येऊन उत्तर देणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी दिली.शिवसेना पक्षाची हानी करणारे एक राऊत जेलमध्ये गेले, आता दुसरे राऊत मैदानात उतरले आहेत, ते आहे ती संपविणार आहेत. त्यांना योग्य उत्तर दिले जाईल असे आमदार केसरकर म्हणाले. जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे आजच्या सभेत ५००-१००० लोक उपस्थित होते, तर मी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा २५ हजार लोक होते असा टोला केसरकर यांनी हाणला.

सावंतवाडीमध्ये येऊन सभेला उत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यासाठी मुंबईमध्ये राहात आहे. केंद्र व राज्य स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका मांडली जात आहे असे केसरकर यांनी सांगितले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  आज निष्ठा दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता त्यांनी सावंतवाडी मतदारसंघाचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात शिवसेना समर्थकांसोबत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चिटणीस नाका ते गांधीचौक अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षातील ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे गटाची बाजू भक्कम आहे. दुसरीकडे मुख्य शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेत झालेली ही मोठी फूट भरून काढण्यासाठी शिवसेना  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे चांगलेच कामाला लागले आहेत.

Source link

Leave a Reply