Headlines

केदार दिघेंच्या अडचणीत वाढ, बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल | FIR filed against kedar dighe for threat to rape victim friend rohit kapoor main accused rmm 97

[ad_1]

धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी कपूर यानं धनादेश देण्यासाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

पीडित तरुणीने याबाबत तक्रार करू नये, म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावलं आहे, असा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यासह केदार दिघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिघे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) तर मित्र रोहित कपूर याच्याविरोधात कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणीनं गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- “ते अमेरिकेतूनही समर्थन फॉर्म भरून घेतील” आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका!

दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलै रोजी केदार दिघे यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हेदेखील शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्मार्ट खेळी करत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना राजकीय मैदानात उतरवत त्यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. यानंतर आता बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *