KBC ने या स्पर्धकाला बनवलं लाखो रूपयांचा मालक


Success Story: आपल्या नशीबात कधी आपल्याकडे पैसे असतात तर कधी आपल्याकडे ते नसतात परंतु आपली ही परिस्थिती बदलल्यासाठी फक्त एका चांगल्या संधीची आवश्यकता असते. ती संधी मिळाली तर आपण आपल्या संधीचं चांगलं सोनं करू शकतो. अशाच एका व्यक्तीने आपल्याकडे आलेल्या संधीचं सोनं केलं आहे ज्यामुळे त्याचं नशीबचं बदलून गेलं आहे. (kbc participants won 50 lakh who first didnt had any money to buy clothes read who is he)

जर स्वप्ने उघड्या डोळ्यांनी पाहिली तर ती केवळ स्वप्नेच राहत नाहीत तर जीवनाचे ध्येय बनून जातात आणि अशी स्वप्ने पूर्ण करण्यास मदत होते, कौन बनेगा करोडपती.(Kaun Banega Crorepati Show) अशी कितीतरी अधुरी स्वप्ने आहेत जी केबीसीच्या (KBC) मंचावर पूर्ण झाली आहेत. 

आता स्पर्धक ऋषी राजपूत (KBC Participant Rishi Rajput) यांचेही असेच एक स्वप्न या मंचावरून पुर्ण झाले आणि आता ते करोडपती होतील की नाही हेही लवकरच कळणार आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासमोर हॉट सीटवर बसलेले ऋषी राजपूत नुकत्याच आलेल्या प्रोमोतून 50 लाख रूपये जिंकताना दिसत आहेत, 

या शोचा नवीन प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आहे ज्यामध्ये ऋषी राजपूत हे स्पर्धक हॉट सीटवर बसलेले आहेत. ऋषी वेल्डिंगचे काम करतात आणि ते निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. 

त्यांनी सांगितले की कौन बनेगा करोडपतीमध्ये येण्यापूर्वी त्याच्याकडे कपड्यांसाठीही पैसे नव्हते. त्यामुळे कर्जावर कपडे खरेदी करून ते शोमध्ये पोहोचले आहेत. पण आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी 50 लाखांच्या प्रश्नाला अचूक उत्तर दिले आणि एवढी मोठी रक्कम जिंकली आहे. 

50 लाख रुपये जिंकणारा ऋषी राजपूत देखील प्रोमोमध्ये 75 लाखांच्या प्रश्नासाठी खेळताना दिसत आहे. ऋषी या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकतील का… किंवा त्याचे उत्तर चुकीचे असेल की प्रश्नाअभावी ते शो सोडतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या एपिसोडमध्ये मिळतील. Source link

Leave a Reply