Headlines

KBC 14 : महात्मा गांधींसंबंधीत ‘या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितीये का?

[ad_1]

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 14) या रिअॅलिटी शोकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो चांगलाच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आहे. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ चा 14वा सीझन सुरु आहे. अनेक स्पर्धक शोचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी गप्पा मारतात बऱ्याचवेळा तर त्यांच्या खासगी आयुष्यासंबंधीत अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसातात. तथापि, नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये स्पर्धकांनी मोठी कमाई केली आहे. 

‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये, स्पर्धक पूजा त्रिपाठी फास्टेस्ट फिंगर फर्स्टचं उत्तर देणारी पहिली स्पर्धक ठरली. अमिताभ बच्चन यांनी त्यांचे कौतुक केले, तर पूजा यांचे एका प्रश्नामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पूजा त्रिपाठी यांनी तीन लाइफलाइन वापरून 25 लाखां रुपये जिंकले होते. मात्र, त्यांना 50 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही आणि त्यांना ही चूक चांगलीच महागात पडली आहे. बिग बींनी 50 लाख रुपयांसाठी पुढे देण्यात आलेला प्रश्न विचारला. 

‘मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी त्यांच्या कार्यालयात असलेले महात्मा गांधींचे ते चित्र कोणी काढले?’

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पूजा यांना 4 ऑप्शन देण्यात आले होते. A) अकबर पदमसी, B) लक्ष्मण पाई, C) वासुदेव गायतोंडे, D) उपेंद्र महारथी 
या प्रश्नाचे योग्य उत्तर हे ‘उपेंद्र महारथी’ आहे. 

पूजा यांनी या प्रश्नाचे उत्तर B असल्याचे सांगितले. पूजा यांचे उत्तर ऐकता बिग बींनी त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले. मात्र, पूजा या Risk घेतात आणि B हा ऑप्शन निवडतात. हे उत्तर चूकीचे निघाल्यानं पूजा या 50 लाख रुपये ही मोठी रक्कम हरल्या. दरम्यान, शेवटी पूजा या 3 लाख 20 हजार रुपये घरी घेऊन गेल्या. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *