कायम Hijab मध्ये राहण्यासाठी आणखी एका अभिनेत्रीचा कला जगताला अलविदा


मुंबई : ‘दंगल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री झायरा वसिम हिनं पदार्पणातच दणका दाखवला. पण, ही अभिनेत्री कारकिर्द गाजवणार असं वाटत असतानाच तिनं कला जगतातून काढता पाय घेतला. हिजाबमध्येच राहण्याचा निर्णय घेत अल्लाहच्या सेवेतच आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय तिनं घेतला. (Hijab Row)

तिच्यामागोमागच आता आणखी एका अभिनेत्रीनं आपण या झगमगाटापासून दूर जात असल्याचं सोशल मीडियावाटे जाहीर केलं. 

गेल्या दोन वर्षांपासून आपण एकाच गोष्टीमुळं विवंचनेत असल्याचंही तिनं सांगितलं. 

‘बिग बॉस 11’मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री महजबी सिद्दीकी हिनं तिच्या बदललेल्या रुपानं सर्वांनाच हादरा दिला. ज्यानंतर आता आपण कायमच हिजाबमध्ये राहणार असल्याचं सांगत तिनं धर्माच्या वाटेवर चालण्याचा निर्णय घेतला. 

एका लांबलचक पोस्टच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली. तिची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

‘मी हे यासाठी लिहित आहे, कारण गेल्या 2 वर्षांपासून मला काहीच कळत नव्हचं. मी असं काय करु ज्यामुळं मला शांतता मिळू शकेल हेच लक्षात येत नव्हतं’, असं तिनं लिहिलं. 

अल्लाहचा शब्द डावलून कोणालाही कधीच उसंत मिळत नाही. तुम्ही कोणालाही कितीही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या व्यक्ती आनंदी होत नाहीत, असं ती म्हणाली. 

अल्लाहला आनंदात ठेवून , त्यामुळं मला शांतता मिळाली असं म्हणत अल्लाहनं माझी पापं माफ करावीत आणि मला योग्य मार्ग दाखवावा असा विचार तिनं सर्वांसमोर ठेवला. 

सध्या सुरु असणारा हिजाब वाद आणि त्यारम्यानच अभिनेत्रीनं घेतलेला हा निर्णय़ सध्या अनेकांना धक्का देणारा ठरत आहे. Source link

Leave a Reply