Headlines

काय ते सौंदर्य, काय ती साडी…; सोशल मीडियावर Saree Petition दाखल करणाऱ्या तरुणीचीच चर्चा

[ad_1]

मुंबई : ऑरकुट आलं, ऑरकुट गेलं. फेसबुक आलं, प्रचंड लोकप्रिय झालं आणि आता तेही मागे पडलं. सध्या जमाना आहे, तो म्हणजे इन्स्टाग्रामचा. ज्याच्यात्याच्या हातात असणाऱ्या फोनमध्ये इन्स्टाग्राम नाही, असं क्वचितच होतं. फोटो म्हणू नका, किंवा मग व्हिडीओ. इन्स्टाग्रामवर दर दिवशी असंख्य गोष्टी व्हायरल होताना दिसतात. काही गोष्टी इतक्या गाजतात की त्यावरून नजरच हटत नाही. 

असेच काही फोटो इन्स्टाग्रामवरील कॉमन सर्चमध्ये सध्या दिसत आहेत. हे फोटो आहेत एका तरुणीचे. सहावार साडी नेसून ही तरुणी एकाहून एक सरस फोटो शेअर करत असते. 

हल्लीच तिनं काही फोटो शेअर केले जिथं ती लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. स्लीव्हलेस ब्लाऊज, लो वेस्ट साडी, लहानसा पदर आणि त्यातही उठून दिसणारा तिचा कमनीय बांधा काळजाचा ठोकाच चुकवत आहे. 

Petition to make every day a saree day! असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. फोटो जितके सुंदर तितकंच हे कॅप्शनही लक्षवेधी ठरत आहे. 

फक्त तरुणच काय, तरुणीसुद्धा या युजरच्या फोटोंवर भाळत आहेत. सौंदर्याची प्रशंसा केलीच पाहिजे, असं म्हणत तरुणीसुद्धा या आर्शा मोहन नावाच्या सोशल मीडिया युजरकडून नकळतच काही टीप्स घेताना दिसत आहेत. (Social media user aarsha mohan saree look goes viral)

साडी लूक कॅरी करण्याची तिची पद्धत असो, किंवा अगदी साधी साडीसुद्धा स्त्रीचं सौंदर्य कशा पद्धतीनं खुलवू शकते हे नकळतच दाखवणं असो, आर्शा तिच्या या गुणांनीच सोशल मीडियावर कमाल प्रसिद्ध आहे. 

फक्त साडीतच नव्हे, तर ती वेस्टर्न आऊटफिटमध्येही तितकीच सुरेख दिसत आहे. प्रत्येक लूक कॅरी करताना तिच्या चेहऱ्यावर असणारा आत्मविश्वासही पाहण्याजोगा आहे. व्हायरल होणाऱ्या असंख्य पोस्टमध्ये आर्शाच्या पोस्ट खरंच लाईक करण्याजोग्या, नाही का? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *