कतरिना कैफच्या मैत्रिणीकडून मोठं वक्तव्य, लग्नासाठी कतरिनाने ठेवली होती ही अट


मुंबई : बॉलिवूडचं लव्हेबल कपल कतरिना कैफ आणि विक्की कौशल या दिवसात आनंदी विवाहीत जीवन जगत आहेत. दोघंही गेल्यावर्षी 9 डिसेंबर 2021 ला विवाहबंधनात अडकले. आज यांच्या मॅरिड लाईफला ३ महिने पुर्ण झाले आहेत. या दरम्यान कतरिनाने विक्कीसमोर एक अट ठेवली होती. ती अट मान्य करुनच कतरिनाचा हात विक्कीने लग्नासाठी धरला.

आता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले असतील,  लग्नाआधीही त्यांचं नातं खूप प्रेमळ असेल असं विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांना वाटलं असेल.. मात्र, सत्य काही वेगळंच आहे. विकी कतरिनाला आपला जोडीदार बनवण्यासाठी सुरुवातीपासून शोअर होता.  दुसरीकडे मात्र याच्या उलट चित्र होतं. कतरिनाच्या मनात सुरुवातीपासूनच भीती होती.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, विकी कौशलला कतरिनाशी लग्न करण्यासाठी राजी करणं इतकं सोपं नव्हतं. कतरिनाच्या एका जवळच्या मैत्रिणीने लग्नाच्या इतक्या दिवसांनी हे गुपित उघड केलं आहे. कॅट कोणत्या अटीवर लग्नासाठी तयार होती. अलीकडेच, कॅटच्या मैत्रीणीने दोघांचं नातं, रोमान्स आणि लग्नाविषयी सांगितलं.

कतरिनाच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितलं की, कॅटसाठी हे लग्न करणं ईतकं सोपं नव्हतं. ती आपल्या पहिल्या ब्रेकअपला घेवून खूप घाबरली होती. ती विकीला पसंत करायची. मात्र विचार करण्यासाठी तिला अजून थोडा वेळ हवा होता. ती पुढे म्हणाली की, विकी कौशलने कॅटसोबत रिलेशनशिपमध्ये असताना महिन्या भरातच ठरवलं होतं की, जिच्यासोबत तिला पुर्ण आयुष्य घालवायचं आहे ती हिच मुलगी आहे. 

मात्र कतरिनाला याबाबत मात्र खात्री नव्हती. विकीने आपले प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर कतरिनासोबत लग्न करण्यास होकार मिळवला. मात्र कॅटने विक्कीला या आधी एक अट घातली होती. विक्कीला माझ्याही कुटुंबाला आपल्या कुटूंबाला देतो तसाच आदर आणि मान-सन्मान द्यावा लागेल. अशी अट कतरिनाने विकीला घातली होती. मग काय, विकीने क्षणाचाही विलंब न करता ही अट मान्य केली आणि अखेर दोघांनी ९ डिसेंबरला लग्न केलं. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टवर या कपलने सात फेऱ्या घेतल्या.Source link

Leave a Reply