Headlines

“…कानातला मळ आताच काढून ठेव”; ‘नाच्या’शी तुलना करत विनायक राऊतांच्या टीकेला शहाजीबापू पाटलांनी दिलं उत्तर | eknath shinde supporter MLA Shahajibapu Patil slams Shivsena MP Vinayak Raut scsg 91

[ad_1]

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी रविवारी सांगोला येथे घेतलेल्या सभेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. या टीकेला आता ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ फेम शहाजीबापू पाटलांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. मी जर सोंगाड्या असेल तर विनायक राऊत काय नाच्या आहेत का? असा प्रश्न शिंदे गटातील आमदार असणाऱ्या शहाजीबापू पाटलांनी विचारला आहे.

सध्या महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू असून ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, अशी टीका शिवसेना नेते विनायक राऊत यांनी रविवारच्या आपल्या भाषणात केली. बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणाऱ्या भडभुंच्या लोकांना राज्यातली जनता माफ करणार नाही, असंही विनायक राऊत फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हणाले. “महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू आहे. ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. हे मुख्यमंत्री राष्ट्रगीत सुरू असताना शर्ट खाली-वर करतात. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्देव आहे,” अशी टीका विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना केली.

”जर तुम्हाला शिवसेनेशी गद्दारीच करायची होती. तर भाजपात जायचे होते. मात्र, या लोकांना आपली आमदारकी विकली, १२ लोकांना आपली खासदारकी विकली. ४० चोर गेले म्हणजे शिवसेनेचा परिवार संपत नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला. “शहाजी बापु पाटलांसारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो,” असंही ते म्हणाले. “शहाजी बापू पाटील यांच्या सारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, पण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. हे सांगोल्याच्या मतदारांनी ठामपणे दाखवून दिलं आहे. छोटे-छोटे विद्यार्थीही ‘नॉट ओके’ आणि ‘शिवसेना विल बी ओके’ असं म्हणत आहेत. त्यामुळे सांगोल्यातील जाहीर सभेत संपूर्ण परिस्थिती भगवामय दिसेल,” असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी भाषणामध्ये विनायक राऊत यांनी शहाजीबापू यांना सोंगाड्या असं म्हटलं.

शहाजीबापूंनी विनायक राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना थेट कोकणामध्ये सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच त्यांनी विनायक राऊत यांना मी नाच्या म्हटल्यास वाईट वाटता कामा नये, असंही विधान केलं आहे. “आज सांगोला येथे खासदार विनायक राऊत यांनी उरल्या सुरल्या तुटपुंज्या शिवसेनेची सभा घेतली. या शिवसेनेचं वैभव सांगोला तालुक्यामध्ये लाखोच्या संख्येनं लोकांच्या उपस्थितीत मेळावे भरवण्याचं होतं. तिथं विनायक राऊतांवर ५०-६० टुकार पोरांच्या उपस्थिती मेळावा घेण्याची वेळ आली,” असा टोला शहाजीबापू यांनी लगावला आहे. तसेच, “त्यांनी सरकारसंदर्भात बोलताना हा काळू-बाळूचा तमाशा आहे आणि शहाजीबापू सोंगाड्या आहे, असं विधान केलं. अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जी लाचारी सुरु आहे त्यात काय विनायक राऊत नाचत होता का? असं एखादं विधान मी केलं तर त्यांना वाईट वाटायला नको,” असंही शहाजीबापू म्हणालेत.

“विनायक राऊतांच्या प्रत्येक मुद्द्याला पावसाळा संपल्या संपल्या कोकणामध्ये त्यांच्या मतदरासंघात जाऊन, सात तालुक्यांमध्ये सात सभा घेऊन मी सडेतोड उत्तर देणार आहे. ते आज इथं बोलले म्हणून मी इथं बोलणं बरोबर नाही. कोकणातील माझी भाषणं ऐकण्यासाठी विनायक राऊतला सांगतो की तुझ्या कानातला मळ आताच काढून ठेव,” असा इशाराही शहाजीबापू पाटलांनी विनायक राऊतांना दिला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *