कशी वाटतेय जोडी ? चेहरा नव्हे, ओळख वाचून म्हणाल हे तर ठाऊकच नव्हतं…


Wedding News : असं म्हणतात काही जोड्यांची गाठ ही स्वर्गात बांधलेली असते. काही जोड्या या Made For Each other असतात. तर काही जोड्या एकमेकांपासून भिन्न असतानाही तितक्याच पूरकही असतात. कशा? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो याचीच प्रचिती देत आहे. 

हा फोटो पाहताना काही ट्रोलर्सनी त्यांना जमतं तेच काम केलं. अर्थात फोटोत दिसणाऱ्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. अर्थात ही जोडी कोण आहे, याचा अंदाज त्यांना बहुधा नसावा. 

पण, तुम्ही अशी चूक करू नका. कारण ही जोडी दाक्षिणात्य कलाजगतामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. ही जोडी आहे नयनतारा (Nayantara) आणि दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांची. 

सहा वर्षांच्या नात्यानंतर नयनतारा आणि विग्नेशनं मागील वर्षी साखरपुडा केला. सध्या विग्नेश  ‘एके 62’ या चित्रपटावर काम सुरु करण्याच्या प्रतीक्षेत आहे. पण, त्याआधी मात्र तो लग्न करण्याचा बेत आखत असल्याचं कळत आहे. 

येत्या काळात आगामी प्रोजेक्टमुळं विग्नेश कामात गुंतण्याआधीच लग्न उरकण्याच्या तयारीत कळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नसली तरीही जून महिन्यात नयनतारा आणि विग्नेश लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Vignesh Shivan संग इस दिन ब्याह रचाएंगी Nayanthara !! जानिए तारीख

गेल्या काही काळापासून ही जोडी अनेक मंदिरांनाही भेट देताना दिसत आहे. येत्या काळात नयनतारा दिग्दर्शक एटली कुमारच्या आगामी  चित्रपटात झळकणार आहे. शिवाय समंथा रुथ प्रभू आणि विजय सेतुपती यांच्यासोबत ती ‘काथु वकुला रेंडु कधल’मध्येही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 

कामाच्या व्यापातून वेळ काढत आता या जोडीनं लग्नाचा निर्णय घेतला खरा, पण त्यांच्या लग्नाची नेमकी तारीख काय याचीच उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे. Source link

Leave a Reply