Headlines

कसलं लग्न आणि कसलं काय… इथे तयारी सुरु होताच मलायकानं धरली हिमालयाची वाट

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा प्रियकर, अभिनेता अर्जुन कपूर लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला. मलायकाच्या खासगी जीवनात आलेली वादळं, त्यानंतर अर्जुनच्या रुपात तिच्या आयुष्यात परतलेलं प्रेम आणि या नात्यातही तिच्या वाट्याला आलेले चढउतार या साऱ्यापासूनच आता मलायका पुढे आली आहे. (malaika arora arjun kapoor wedding date)

जीवनात एक नवी सुरुवात करण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ज्याचीच पहिली पायरी म्हणजे तिनं बाळगलेला सकारात्मक दृष्टीकोन आणि त्याचसाठी असणारा तिचा अट्टहास. (Malaika Arora )

मलायका आणि अर्जुननं त्यांच्या नात्याला आता नवी ओळख देण्याचं ठरवल्याच्या चर्चा असतानाच, या अभिनेत्रीनं मात्र थेट हिमालयाची वाट धरल्याचं म्हटलं जात आहे. 

शुभ्र कपडे, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि चेहऱ्यावर असणारी शांतता हे सर्वकाही तिच्या हिमालयातील फोटोंकडे पाहून लक्षात येत आहे. लग्नाच्या चर्चांमध्येच तिनं हिमालयाची वाट का धरली यामागचं कारण कळू शकलेलं नाही. 

दरम्यान, मलायका तिथं एकटी गेलेली नाही. तिथं तिला आई आणि बहीण अमृता या दोघींहीची साथ आहे. सोशल मीडियावर या तिघींच्याही हिमालय दौऱ्यातील फोटो पाहण्याची संधी मिळाली आहे. 

आनंदाची वेगळीच परिभाषा मलायकानं इथे सर्वांना सांगितली आहे. ‘आनंद… आणखी काय बोलू मी… ही एक अशी जागा जिथं मला सर्वाधिक आनंद मिळतो, एक अशी जागा जिथं मला आनंद देणारी लोकं आहेत. मी आणखी कशाचीच अपेक्षा करु शकत नाही. इतक्या प्रेमळ वातावरणानं मला वेढलंय या वर विश्वासच बसत नाहीये.. घर म्हणजे आई… घर म्हणजे आम्ही…’, असं तिनं लिहिलं. 

मलायकानं हे फोटो शेअर करताच तिच्या या फोटोंवर चाहते आणि कलाकार मित्रांनी भरभरून कमेंट्स केल्या. 

सततचा कामाचा व्याप, त्यातच धकाधकीचं आयुष्य, श्वासही घडाळ्याच्या काट्यावरच घ्यावा इतकं वेगानं चालणारं आयुष्य या साऱ्यामध्ये मलायकानं स्वत:साठी हा वेळ काढला आहे. तिला मिळणारी ही शांतता पाहून अर्जुनही सुखावला असणार यात शंका नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *