Headlines

करोनातील मरगळ दूर होऊन मालमत्ता खरेदी-विक्री पूर्वपदावर च नोंदणी, मुद्रांक शुल्क विभागाला चार महिन्यांत साडेदहा हजार कोटी

[ad_1]

प्रथमेश गोडबोले, लोकसत्ता

पुणे : राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांतून चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या चार महिन्यांत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला साडेदहा हजार कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. यंदा या विभागाला वार्षिक  ३२ हजार कोटी रुपयांच्या महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जुलैअखेपर्यंत त्यातील ३३ टक्के उद्दिष्ट पार करण्यात विभागाला यश आले आहे. त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून करोनामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना आलेली मरगळ आणि बांधकाम क्षेत्रातील मंदीची स्थिती दूर होत व्यवहार पूर्वपदावर आले असल्याचे स्पष्ट होत आहे.

 गेल्या दोन वर्षांची तुलना करता यंदा जुलैअखेर सर्वाधिक दहा हजार ६१४.६४ कोटी रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात असणारी मंदी आणि करोनामुळे आर्थिक उत्पन्नावर झालेला परिणाम यांचे सावट दूर होऊन आर्थिक चक्र सुरळीत सुरू झाले आहे. करोनामुळे रुतलेल्या अर्थचक्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली होती. तसेच रेडिरेकनर दरही वाढविण्यात आले नव्हते. मात्र, यंदा नव्या आर्थिक वर्षांत रेडिरेकनरचे दर राज्य सरकारने वाढवले. तसेच मेट्रोची कामे सुरू असलेल्या महानगरांत मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर एक टक्का मेट्रो अधिभारही लावला. तरीदेखील गेल्या चार महिन्यांत वार्षिक उद्दिष्टाच्या ३३ टक्के महसूल मुद्रांक शुल्क विभागाला प्राप्त झाला आहे, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जुलैअखेपर्यंत आठ लाख ४४ हजार ९९० दस्तांची नोंदणी होऊन त्यातून दहा हजार ६१४.६४ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिल महिन्यात १८०२ कोटी, मे महिन्यात २८०७ कोटी, जून महिन्यात ३४२३ कोटी, तर जुलै महिन्यात २५८० कोटी रुपयांचे महसूल मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांवर परिणाम झाला होता. मात्र, मुद्रांक शुल्कात सवलत असल्यामुळे दस्त नोंदणीच्या तुलनेत प्राप्त होणारा महसूल कमी होता, असे निरीक्षणही मुद्रांक शुल्क विभागाकडून नोंदविण्यात आले.

गेल्या दोन वर्षांतील पहिल्या चार महिन्यातील दस्त नोंदणी आणि प्राप्त महसूल (कोटींत)

                     २०२१-२२                                   २०२२-२३

              दस्तसंख्या         महसूल              दस्तसंख्या           महसूल               

एप्रिल          १,७२,५५२        ८०७.३९             २,११,९१२              १८०२.९४

मे             १,२३,८१५        १११७.३३            २,२२,५७६              २८०७.७७

जून            २,०७,४१८         १७५०.९५            २,४१,२८६              ३४२३.८९

जुलै           १,६९,५३२         २३२६.०५            १,६९,२१६              २५८०.०४

एकूण          ६,७३,३१७         ६००१.७१           ८,४४,९९०               १०,६१४.६४

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *