करीनाच्या Ex-Husband चं नाव आलं समोर?


मुंबई : बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी आहे. करीना आणि अभिनेता आमिर खाननं दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण 7 मध्ये हजेरी लावली होती. यावेळी करीना आणि आमिरनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान, करण यावेळी करीनाला चुकून असं काही बोलतो की करीनाला धक्का बसतो आणि आमिर आश्चर्यचकित होतो. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

हा शो जे फॉलो करतात त्यांना माहित असेल की आमिर खान शोमध्ये तीन वेळा दिसली आहे, तर करीना कपूर ही सुरुवातीपासूनच ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसते. तिच्या भूतकाळाविषयी बोलताना करण म्हणाला, ‘बेबो, तू या शोमध्ये खूप वेळा आली आहेस. तू तुझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आली आहेस. बेबो तू तुझ्या पतीसोबत, पूर्वाश्रमीच्या पती… आणि नंतर करणनं स्वत: ला थांबवलं आणि करीना त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होती. तर दुसरीकडे आमिरला यावर खूप हसायला आले. पूर्वाश्रमीचा पती नाही, माफ कर. ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत होती आणि नंतर तिच्या पतीसोबत होती. 

तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात, करीना शाहिद कपूरला डेट करत होती आणि दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मोकळेपणानं सांगितले होते. 2007 मध्ये ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दोघांनी आपापल्या वाटा वेगळ्या केल्या. खरं तर, शोमध्ये त्यांच्या नात्याबद्दलचा आणखी एक संदर्भ रॅपिड फायर राउंड दरम्यान होता जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की ‘शाहिद त्याच्या पार्टीमध्ये ज्या व्यक्तीला आमंत्रित करणार नाही तो कोण असेल? त्यावर करीनानं उत्तर दिलं की, ‘मी, मला वाटते.’

त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर शाहिद कपूर आणि करीना कपूर खान दोघे ‘जब वी मेट’ हा चित्रपट सोडला तर नंतर कधीही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले नाही. तर उडता पंजाब या चित्रपटात ते दोघे एकत्र असले तरी त्यांचा एकही  एकत्र असा सीन नव्हता. दरम्यान, लवकरच करीना आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांचा ‘रक्षाबंधन’ देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षक यातील कोणत्या चित्रपटाला पसंती देतात, कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Source link

Leave a Reply