करीना कपूरच्या “प्रेग्नेंसी बायबल” विरोधात बार्शी पोलिसांकडे तक्रार

काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष राकेश नवगिरे यांच्या वतीने करिना कपूर यांच्या “प्रेग्नेंसी बायबल” या पुस्तका वर करिना कपूर व लेखिका याच्या विरोध बार्शी शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली

बार्शी – बॉलीवूड अभिनेत्री करीना ( कपूर) खान व सहकारी लेखिका आदिती शहा यांनी ” प्रेग्नसी बायबल” या नावाने पुस्तक प्रकाशित केले आहे.

प्रेगन्सी बायबल या पुस्तकाचे शीर्षक प्रकाशित करत असताना अभिनेत्री करीना कपूर व तिच्या सहका-यांना ख्रिश्चन धर्मीयांच्या भावनांचा विसर पडला असावा. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्मी यांचा पवित्र ग्रंथ आहे. बायबल हा शब्द प्रेग्नसी बायबल यात वापरून ते पुस्तक लेखिकेने व प्रकाशकाने प्रकाशित केले आहे. त्यामुळे अभिनेत्री करीना कपूर, आदिती शहा, व प्रकाशकावर, भा. द. वी. वी. कलम २९५ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा.

अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष राकेश नवगिरे यांच्या वतीने करण्यात आली असून. यासंदर्भातील निवेदन बार्शी पोलीस स्टेशनला मा.पोलीस निरीक्षक व मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे , अल्पसंख्याक मंत्री मा.नवाब मलिक साहेब,अल्पसंख्याक विकास व मराठी भाषा मंत्री. मा. विश्वजीत कदम , सांस्कृतिक मंत्री मा. अमित विलासराव देशमुख साहेब यांना ईमेल द्वारे तक्रार केली आहे यावेळी प्रवीण भादिकर (बरशबा चर्च बार्शी), बार्शी चर्च चे सदस्य अंद्रिया रणदिवे सर, आधार दाखले, विकास नवगिरे आदि उपस्थित होते.

Leave a Reply