करायला गेला एक आणि झालं एक… सलमान खानचा जेव्हा लाखो लोकांसमोर होतो ‘पोपट’


दुबई : सलमान खानला बॉलिवूडमधील दबंग खान म्हणून देखील ओळखले जाते. सलमानने अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री देऊन त्यांच्यासाठी या इंडस्ट्रीचे दार खुले केले आहे. सलमानने आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच असे अनेक चित्रपट केले. ज्यामुळे त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. सलमानच्या अशा अनेक डान्स किंवा सिग्नेचर स्टेप्स आहेत. ज्या खुप हिट झाल्या आणि लोक आज पण त्या स्टेप्स लक्षात ठेवतात. परंतु एका इव्हेंट दरम्यान सलमान खान स्वत: त्याच्या एका गाण्याची सिग्नेचर स्टेप विसरला, ज्यामुळे लोखो लोकांसमोर त्याला लाजिरवाणं व्हवं लागलं. यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच ट्रेंड होत आहे, ज्यामुळे सलमान खान ट्रोल देखील होत आहे.

Da-Bangg The Tour – Reloaded मधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा कार्यक्रम दुबई एक्स्पो 2020  मध्ये झाला होता.

येथे सलमान खान पूजा हेगडेसोबत डान्स करत होता. त्यावेळी सलमान खान त्याच्या किक चित्रपटातील ‘जुम्मे की रात’ या गाण्याची हुक स्टेप पुजा हेगडे सोबत करत होता. परंतु त्याला ते जमले नाही, ज्यामुळे अभिनेत्याला सर्वांसमोर लाजेने मान खाली घालावी लागली.

खरंतर या गाण्यात जॅकलीन फर्नांडिससोबत सलमानने डान्स केला होता. परंतु पूजा हेगडे सोबत, त्याला हे जमले नाही.

सलमान खानने या गाण्यात जॅकलीनच्या ड्रेसला दात धरले आहेत आणि त्यावर डान्स करते. हे गाणं रातोरात हिट झालं आहे.

या गाण्यादरम्यान जॅकलीनचा ड्रेस लाँग होता, ज्यामुळे सलमानला त्याला दातात धरणे शक्य झाले होते. परंतु येथे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पूजा हेगडेचा ड्रेस बॉडी फिटिंग असल्यामुळे सलमानला हे करणं जमलं नाही.

परंतु सलमान खानने ज्या प्रकारे यानंतरची परिस्थीती हाताळली त्याबद्दल त्याचे काही चाहत्यांनी कौतुक केले. परंतु काहींनी सलमान खानचा पोपट झाला असल्याचे देखील म्हटले आहे. एका व्यक्तीने त्याला “नॉनसेन्स” म्हटले आहे.Source link

Leave a Reply