Headlines

पुरुषासारखा आवाज असावा म्हणून Karan Johar नं….; त्याच्या खासगी आयुष्याबाबतचा सर्वात मोठा खुलासा

[ad_1]

Karan Johar Birthday Special : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. करण जोहरला त्याच्या वागणूकीसाठी किंवा मग त्याच्या ड्रेसिंगवरून त्याला अनेकांनी बऱ्याचवेळा ट्रोल केलं आहे. बऱ्याच वेळा करण जोहरला अनेकांनी मुलींसारखा चालतो किंवा तसाच बोलतो असं म्हणतं अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. आज करण जोहरचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया… त्यापैकी एक म्हणजे करण जोहरचा आवाजही मुलींसारखा बारीक होता त्यामुळे त्याला अनेकदा सुनावण्यात आले होते. तर एका मुलाखतीत करणनं त्याच्या या आवाजाला बदल मुलाचा आवाज येण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग घेतली आणि डॉक्टरांना सांगितलं की माझा आवाज मुलांसारखा करा.  

करणनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की त्याचा आवाज मुलींसारखा बारीक असल्यानं लोक त्याच्यावर हसायचे. ते मला म्हणायचे की मुलींसारखं बोलू नकोस. त्यामुळे करणनं वयाच्या 15 व्या वर्षी स्पीच थेरपिस्टची भेट घेतली होती. त्यांच्याकडे उपचार करण्यासाठी गेले असता करणनं त्यांना सांगितलं की ‘माझा आवाज मुलांसारखा करून द्या. तर त्याला ठीक करण्यासाठी तब्बल 3 वर्षांचा कालावधी लागला. तर पुरुषासारखा आवाज यावा म्हणून करण त्याच्या वडिलांना खोट सांगत डॉक्टरांकडे जायचा. ट्रेनिंगचा हा 3 वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. मला माझा बारीक आवाजाला दमदार बनवण्यासाठी खूप काही सहन करावे लागले.’ 

पुढे या विषयी करण म्हणाला, ‘जेव्हा मी स्पीच थेरपी घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तो काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. मला माझा आवाज दमदार बनवण्यासाठी मोठ्यानं ओरडावे लागत होते.’ इतकंच नाही तर त्याच्या आवडच्या गाण्याविषयी सांगत करण म्हणाला, ‘त्याला सरगम या चित्रपटातील डफली वाले गाण्यावर डान्स करायला खूप आवडायचे. या गाण्यावर तो सतत प्रॅक्टिस करायचा. पण नेहमीच जया प्रदा यांची भूमिका तो साकारायचा.

हेही वाचा : अभिनेत्रीला स्टंटबाजी महागात; Reality Show दरम्यान प्रायव्हेट पार्टवर किड्यांचा हल्ला

दरम्यान, आज करण जोहरचा 51 वा वाढदिवस असून त्याच निमित्तानं त्याचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा फस्ट लूक शेअर करण्यात आला होता. करणनं त्याच्या वाढदिवसानिमित्तानं फर्स्ट लूक शेअर केलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *