Headlines

करण जोहरला करायचं होतं ‘या’ अभिनेत्रीशी लग्न; आज आहे दिग्गज अभिनेत्याची पत्नी!

[ad_1]

बॉलिवूडमध्ये (bollywood) मल्टीस्टारर आणि रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. करण जोहरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतात. करण जोहर (Karan Johar) अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलताना दिसतो पण त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी बोलायला आवडतं. 

पण, एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी करण जोहरचे (Karan Johar) हृदय धडधडायचे. पण आता ती अभिनेत्री एका मोठ्या अभिनेत्याची पत्नी आहे.

करण जोहरचा खुलासा

करण जोहरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी नेहमी गुप्त ठेवायला आवडतात. पण सेलिब्रिटी स्टायलिस्ट आणि डिझायनर अनिता श्रॉफ अदजानियाच्या चॅट शोमध्ये करण जोहरने एक मोठा खुलासा केला आहे. ‘फीट अप विथ द स्टार्स’मध्ये बोलताना करण जोहर म्हणाला होता की, ‘त्याला त्याच्या लाइफ पार्टनरसोबत कम्फर्ट झोन तयार करायचा आहे.’

या चॅट शो दरम्यान, जेव्हा करण जोहरला विचारण्यात आले की त्याला कोणती अभिनेत्री आवडते. यावर उत्तर देताना करण जोहर म्हणाला की, “मला माझ्या BFF करीना कपूरला (Kareena Kapoor Khan) माझी जीवनसाथी बनवायला आवडेल.”

मात्र, करण जोहरने शो दरम्यान सांगितले की, ‘माझे आणि करीना कपूरचे अनेक दिवसांपासून बोलणं झालं नव्हतं. या मागचं कारण ‘कल हो ना हो’ चित्रपटासाठी करीना कपूरने जास्त फी मागण्याचे होते. शाहरुख खानला जेवढे पैसे मिळत होते तेवढेच पैसे करीनाने मागितले होते. मी त्याला नकार दिला होता. मला खूप दुःख झाले. जवळपास वर्षभर आम्ही एकमेकांशी बोललो नाही. हा माझा मूर्खपणा होता कारण ती लहान होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *