कपूर कुटुंबातील जोडप्यात दुरावा, घटस्फोट न घेता विभक्त राहण्याचा निर्णय


मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही असे कुटुंब आहेत, ज्यांना कमालीची प्रतिष्ठा प्राप्त आहे. अशाच कुटुंबांपैकी एक म्हणजे कपूर. अभिनेता राज कपूर यांचे वडील, पृथ्वीराज कपूर यांनी या कुटुंबाला कलाविश्वात मानाचं स्थान मिळवून दिलं. 

पुढे कुटुंबातील पुढच्या पिढीनं हा वारसा पुढे आणला. आजमितीस कपूर कुटुंबातील बऱ्याच सदस्यांनी कलाजगतामध्ये मोलाचं योगदान दिलं. 

सध्या अभिनेता रणबीर कपूर, करिना कपूर यांची पिढी बी- टाऊनमध्ये सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. 

एकिकडे रणबीर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची उत्सुकता हळुहळू शिगेला पोहोचू लागली आहे आणि दुसरीकडे याच कुटुंबातील एका जोडीच्या नात्यात आलेला दुरावा चर्चेत आला. 

खरंतर हा दुरावा आता आलेला नाही. पण, तरीही तो आता चर्चेत आला. यामागचं कारण ठरत आहे, तो म्हणजे कुटुंबातील एका सदस्याचा वाढदिवस. 

सहसा वाझदिवस असला की खासगी आयुष्यांच्या किस्स्यांमधून कलाकार मंडळींचे वेगळे पैलू पाहता येतात. 

अभिनेते रणधीर कपूर यांच्यासोबतही असंच घडलं. पण, त्यांच्या खासगी आयुष्यातील एक वेगळं नातं सध्या समोर आलं.  

रणधीर कपूर यांनी अभिनेत्री बबिता हिच्याशी लग्न केलं. पण, ,1983 पासून त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय़ घेतला, पण घटस्फोट मात्र घेतला नाही. 

When Randhir Kapoor revealed why Babita and he never filed for a divorce

बबिता आपल्या मुली, करिना आणि करिष्मा यांच्यासोबत राहत होत्या. तर, रणधीर एकटे राहत होते. पण 19 वर्षे विभक्त राहिल्यानंतर पुन्हा 2007 ला ते एकत्र आले. 

बबिता आणि रणधीर कपूर यांनी त्यांच्या नात्याला एक नवी संधी दिली आणि आज उतारवयात ही जोडी पुन्हा नव्याने एकत्र आली. Source link

Leave a Reply