Kantara Hindi On OTT : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, जाणून घ्या ‘कंतारा’ हिंदीमध्ये कधी आणि कुठे पाहू शकता


मुंबई : ‘कांतारा’ या सिनेमाची कलाजगतामध्ये  जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रटातील कलाकारांपासून ते अगदी त्यातील गाणी आणि कथानकापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. साधारण सहा महिने चित्रपटासाठी मेहनत घेणाऱ्या ऋषभनं एक अशी कलाकृती आणि एक अशी प्रथा सर्वांसमोर आणली जिथं निसर्ग आणि मानवामध्ये असणारं नातं आणि या नात्यातील दुवा म्हणजेच ‘दैवा’वर भाष्य करण्यात आलं. 

ऋषभ शेट्टी स्टारर कांतारा अखेरीस हिंदीमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरी त्याची हिंदी आवृत्ती अद्याप प्रदर्शित झालेली नाही. आता हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्मात्यांनी तो हिंदीत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची हिंदी आवृत्ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

खुद्द ऋषभ शेट्टीने एक मनोरंजक व्हिडिओ शेअर करून याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितलं आहे की, हा चित्रपट 9 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेल्या क्लिपमध्ये, सोशल मीडियावरील काही चाहत्यांनी त्याला वैयक्तिकरित्या प्रश्न विचारल्यानंतर अभिनेता हिंदीमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरबद्दल बोलताना दिसत आहे.

त्याने लिहिलं की, “ऋषभ शेट्टीचा “कंतारा हिंदीमध्ये कधी येत आहे?” या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं आहे आणि आम्ही अधिक उत्साहित होऊ शकलो नाही! कांतारा 9 डिसेंबर रोजी हिंदीमध्ये नेटफ्लिक्सवर येत आहे.” क्लिप शेअर केल्यानंतर लगेचच, चित्रपटाच्या चाहत्यांनी याचं कौतुक करण्यासाठी कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे.

एका चाहत्याने लिहिलं, “नेटफ्लिक्सवर कांतारा?? नेटफ्लिक्सने सन्मानित केलं.” तर दुसर्‍याने कमेंट करत लिहीलं, “स्मार्ट मूव्ह नेटफ्लिक्स आधी आरआरआर (हिंदी) आणि आता कांतारा.” तर अजून एका सोशल मीडिया युजर्सने लिहिलं की, “हिंदी आवृत्तीची आतुरतेने वाट पाहत आहोत.”Source link

Leave a Reply