Headlines

कंगनाच्या घरी आली नवी पाहुणी; स्वागत करताना आनंदाला उधाण

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून लोकप्रिय असणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) पडत धडपडत; अडथळे ओलांडत कंगनानं तिच्या नशिबात असणारी प्रसिद्धी अखेर मिळवलीच. अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत बहुतांश क्षेत्रांमध्ये नशीब आजमावणारी कंगना आज अशा वळणावर आली आहे, जे पाहता आता तिला खरंच राणी म्हणावं लागेल, अशी चाहत्यांची प्रतिक्रिया व्यर्थ वाटत नाही. 

आगामी ‘धाकड़’ (Dhaakad) या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असणाऱ्या कंगनाच्या घरी म्हणे आता एक नवी पाहुणी आली आहे. ही नवी पाहुणी म्हणजे कंगनाची महागडी आणि आलिशान अशी कार. 

काळ्या रंगातील मर्सिडीज (Mercedes Maybach S680) ही कार तिनं खरेदी केली आहे. एका इन्स्टा अकाऊंटवरून कंगनाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इथं ती आणि तिच्यासोबत कुटुंबातील काही मंडळी मोठ्या कौतुकानं या कारकडे पाहताना दिसत आहेत. 

कंगनानं खरेदी केलेल्या मर्सिडीज मेबॅक कार जवळपास 5 कोटी इतक्या किमतीची आहे. याआधीही कंगनाकडे बऱ्याच महागड्या कार आहेत. मेबॅकच्या रुपानं त्यात आणखी भर पडली आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र असतानाच कंगनाच्या घरात ही नवी पाहुणी आलिये… लाखामोलाची नव्हे तर, कोट्यवधींची ही पाहुणी तिच्यासाठी खास असणार यात वाद नाही. 

तुम्हाला कशी वाटली कंगनाची ही नवी कार? कमेंटमध्ये नक्की कळवा… 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *