कंगना रणौत पुन्हा एकदा अडचणीत, हायकोर्टानं फटकारलं


मुंबई: अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एकता कपूर आणि कंगना रणौत नुकताच आलेला लॉक अप शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शो विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून हे प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. हा शो 27 फेब्रुवारीला येणार होता. मात्र आता कदाचित त्याच्या तारखा पुढे जाण्याची शक्यता आहे. 

एका याचिकाकर्त्याने या शोची कॉन्सेप्ट चोरल्याचा आरोप केला आहे. श्री सनोबर बेग असं या याचिकाकर्त्याचं नाव आहे. दराबादच्या सिटी सिव्हिल कोर्टात त्याच्या अर्जावर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने लॉक अप शो प्रदर्शित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Lock Upp या शोसंदर्भात बोलताना बेग म्हणाले की मी गेल्या काही काळापासून अभिषेक रेगे यांच्या संपर्कात आहे. त्यांनी थोडी परिस्थिती सुधारल्यावर आपण यावर काम करूया असं सांगितलं होतं. त्यांच्यासोबत माझ्या अनेकदा मीटिंगही झाल्या आहेत. आता हा लॉकअप शो मी तयार केलेल्या कॉन्सेप्टची जशीच्या तशी कॉपी असल्याचा दावा बेग यांनी केला आहे. 

बेग पुढे म्हणाले की मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र अशा प्रकारे माझी संकल्पना चोरीला जाईल याची जराही कल्पना नव्हती. या शोचा जेव्हा टीझर समोर आला तेव्हा माझ्या पाया खालची जमीनच सरकली कारण यातली कॉन्सेप्ट पूर्णपणे कॉपी केली होती. 

या सगळ्या प्रकरणानंतर आता एकता कपूर आणि कंगना रणौत काय निर्णय घेणार? त्यांच्या अडचणी आणखी वाढणार का? खरंच या शोच्या प्रदर्शित होण्याच्या तारखा पुढे जाणार का? हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. Source link

Leave a Reply