Kangana Ranaut अखेर ‘त्या’ गोड बातमीसाठी सज्ज; पाहणारेही अवाक्


मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत ही कायमच तिच्या वादग्रस्त वक्यव्यांसाठी चर्चेचा विषय ठरते. कित्येकदा तर तिच्या वक्तव्यांमुळं नव्या वादाला तोंड फुटतं. कधी कोणा राजकीय पक्षावर, कधी कोणा महत्त्वाच्या मुद्द्यावर तर कधी कोणा कलाकारावर तिचं व्यक्त होणंही वादाला वाचा फोडण्यासाठी पुरेसं होतं. (Kangana Ranaut)

आता म्हणे हीच कंगना एका Good News सह सज्ज झाली आहे. कंगना देऊ पाहणारी ही गूड न्यूज काय बरं असेल? पडतोय ना प्रश्न? 

ती लग्न करतेय का? ती कोणाच्या प्रेमात आहे का? असे प्रश्न आतापर्यंत तुमच्या मनात घरंही करुन गेले असतील. पण, ही गोड बातमी याहूनही वेगळी आहे असं आम्ही म्हटलं तर? 

 ‘तनू वेड्स मनू’ (Tanu Weds Manu) हा चित्रपट आणि त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळवून गेला. ज्यानंतर आता जवळपास 7 वर्षांनी या चित्रपटाचा पुढला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

चित्रपटात मह्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेल्या झिशान आयुब यानंच याची माहिती दिल्याचं कळत आहे. 

चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये कंगना आणि तिच्याभोवतीच फिरणारं कथानक प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं झिशाननं सांगितलं. 

अद्यापही य़ावर काहीच निश्चित करण्यात आलेलं नाही, पण चित्रपटासाठीचं काम सुरु असल्याचा विश्वास त्यानं दिला. 

तेव्हा आता कंगनाचं आणखी एक रुप नेमकं केव्हा पाहायला मिळतं याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. 

तूर्तास ज्या गोड बातमीची अपेक्षा तुम्ही करत आहात ती कंगना केव्हा देणार हाच प्रश्न आम्हालाही पडतोय… Source link

Leave a Reply