Headlines

कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे, वंचितचे अजित मगर मातोश्रीवर

[ad_1]

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे व वंचित आघाडीकडून पूर्व विधानसभा लढविलेले जि.प.चे माजी सदस्य अजित मगर उद्या सोमवारी मातोश्रीवर पोहोचणार असून दुपारी साडेबारा वाजता शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाल्यानंतर ते पक्षांतराबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यात सुरुवातीला शिंदे गटाच्या हाती काहीच लागले नव्हते. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. ही चर्चा थांबते न थांबते तोच मातोश्रीवर कार्यकर्ते नेऊन शक्तिप्रदर्शन दाखविणारे िहगोलीचे खासदार हेमंत पाटील हेही  शिंदे गटात डेरेदाखल झाले.

जिल्हाभर या शिवसेनेच्या फुटीची चर्चा सुरू होती. मात्र, खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर, राजेंद्र शिखरे, राम कदम, कळमनुरीचे माजी नगराध्यक्ष शिंदे, औंढा नागनाथ नगरपंचायतचे विद्यमान नगराध्यक्ष यांच्यासह एक-दोन पदाधिकारी वगळता जिल्हास्तरावरील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी अद्यापि उध्दव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याचे चित्र आहे.  शिवसेनेत फूट पडल्याने काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे व वंचित आघाडीचे माजी जि.प. सदस्य अजित मगर हे शिवसेनेत दाखल होण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. सोमवारी डॉ.टारफे व अजित मगर हे दोघे दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर पोहोचणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे.  उद्याच्या भेटीबाबतच्या वृत्तास दोन्ही नेत्यांनी दुजोरा दिला आहे.  पक्ष प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असे टारफे म्हणाले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *