काळीज भेदणारे स्वर पुन्हा निनादणार; आजोबांच्या हुबेहूब रुपात दिसणाऱ्या ‘या’ गायकाला ओळखलं?


मुंबई : माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होईल… असं सांगत आपल्या गायकीनं कानसेनांना तृप्त करणाऱ्या संगीतपारंगत पंडित वसंतराव देशपांडे यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्दही अपूरे पडतील. आपल्या गायनकौशल्यानं श्रोत्यांचं आयुष्य सार्थकी लावणाऱ्या याच कलाकाराचा जीवनप्रवास आणि कारकिर्दीतील काही महत्त्वाचे प्रसंग आता रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Me vasantrao)

गायक आणि वसंतरावांचा नातू, राहूल देशपांडे याचीच मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या टीझरमधून याचीच झलक पाहायला मिळत आहे. 

अवघ्या काही सेकंदांच्या या टीझरची सुरुवात होते ती खुद्द वसंतरावांच्याच आवाजानं. त्यांना पाहतच हा टीझर पुढे जातो आणि राहुल देशपांडे अलगद आजोबांनी दिलेली ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलताना दिसतो. 

स्पष्ट आणि तितकाच थेट स्वर, ताना आणि हरकती घेताना त्याच टीपलेले बारकावे हे जितकं आजोबांकडून शिकलो, तितकंच राहुलनं या चित्रपटाच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर उतरवलं. 

मागील 9 वर्षांपासून घेत असलेल्या मेहनतीला आकारस्वरुप मिळताना पाहून, हा दिवस आपल्यासाठी किती आनंदाचा आहे हे राहुलची इन्स्टाग्राम पोस्ट पाहून लक्षात येत आहे. 

जागतिक ख्यातीचे तबला वादक, उस्ताद झाकीर हुसैन यांच्या हस्ते हा टीझर प्रदर्शित केला गेला. 

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशी ही संगीतमय मैफल अनुभवण्यासाठी तुम्ही तयार आहात ना?Source link

Leave a Reply