काकाच्या पार्टीमध्ये कोणा भलत्यासोबतच आली जान्हवी, पाहणारेही हैराण


मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर ही एक अशी अभिनेत्री आहे, जिनं पदार्पणापासूनच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. एका सेलिब्रिटी कुटुंबातील जान्हवी बॉलिवूडमध्ये आली आणि पाहता पाहता तिनं आपलं स्थान भक्कम करण्यास सुरुवात केली. (Janhavi Kapoor )

स्टाईल स्टेटमेंट आणि इतरही सर्वच बबातीत जान्हवी तुफान सक्रीय असल्यामुळं तिचे बदलणारे लूक पाहणंही तितकंच घायाळ करणारं ठरतं. 

कुटुंबातील एखादा कार्यक्रम असो किंवा मग एखादा पुरस्कार सोहळा, जान्हवीच्या येण्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या असतात. 

अशाच एका कार्यक्रमात ती दिसली आणि पाहून सर्वजण थक्क झाले. हा कार्यक्रम होता अनिल कपूर यांच्या जुहू येथील घरी आयोजित करण्यात आलेली पार्टी. 

2019 मधील हा किस्सा. जेव्हा बऱ्याच सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. पार्टीसाठी तिनं इंडियन क्लासिक अशा विभागात येणाऱ्या लूकला पसंती दिली होती. 

स्टड्स असणारी चोळी, हलक्या सोनेरी रंगाचा लेहंगा मोकळे केस असा तिचा एकंदर लूक होता. यावेळी तिनं मिनिमल ज्वेलरी लूकला पसंती दिली होती. 

इथं सर्वांच लक्ष तिच्या गळ्याकडे गेलं. डीप नेकलाईन असणारी ही चोळी जान्हवीच्या बांध्याला शोभून दिसत होती. 

एका पार्टीमुळं रातोरात प्रसिद्धीझोतात येण्याचं आणखी एक कारण म्हणजे जान्हवीसोबत आलेली खास व्यक्ती. 

पार्टीसाठी ती आपला खास मित्र अक्षत रंजन याच्यासोबत आली होती. अक्षत रंजनसोबत दिसण्याची ही तिची पहिलीच वेळ नव्हती. 

 

याआधीची अक्षत आणि जान्हवीला एकत्र पाहिलं गेलं होतं. मुख्य म्हणजे तिची त्याच्यासोबतची केमिस्ट्री पाहून अनेकांनीच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना वाव दिला होता. 

सध्या जान्हवी कोणाला डेट करतेय, किंवा तिच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती कोण याचा खुलासा होऊ शकलेला नाही. पण, जेव्हा केव्हा ती अशा कोणासोबत दिसते तेव्हा चर्चा होणं सहाजिक आहे, हे नाकारता येणार नाही. Source link

Leave a Reply