Headlines

कहर! रणवीर पुन्हा करणार न्यूड फोटोशूट? गुन्हा दाखल झाला तरी त्याची हौस फिटता फिटेना

[ad_1]

Ranveer Singh Nude Photoshoot: काही दिवसांपुर्वीच अभिनेता रणवीर सिंग याने आपले न्यूड फोटोशूट केले होते. त्याचा परिणाम म्हणून रणवीर सिंगला सगळीकडूनच विरोधाचा आणि ट्रोलिंगचा दणका बसला होता. अभिनेता रणवीर सिंगचे हे फोटोशूट देशभरात अगदी वाऱ्यासारखे पसरले होते त्यातून काहींनी यावर टोकाचा विरोध केला तर काहींनी त्याच्या या न्यूड फोटोशूटचे स्वागतही केले. 

या फोटोशूटनंतर ट्रोलिंग आणि विरोधासोबतच रणवीरला चार सल्ल्यांच्या आणि शहाणपणाच्या गोष्टीही सांगितल्या. पण हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर या प्रकरणावरून रणवीरवर थेट गुन्हाही दाखल करण्यात आला. अनेक ठिकाणांहून त्याच्याविरूद्ध निदर्शनेही काढण्यात आली. इतके सगळे होऊनही रणवीर सिंग चिडीचूप आहे मात्र त्याच्या या फोटोशूटवर त्याच्या बॉलीवूड सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या तसेच त्याला पाठिंबाही दिला. 

या सगळ्यातच आता कहर म्हणजे रणवीरला अजून एका न्यूड फोटोशूटची ऑफर आली आहे. ‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल’ म्हणजेच ‘पेटा’ने रणवीर सिंगला न्यूड फोटोशूटची ऑफर दिली आहे. या ऑफरसाठी ‘पेटा’ने रणवीरला लांबलचक  पत्रही दिले आहे. जे सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल झाले आहे. या पत्रात पेटाने रणवीरला न्यूड फोटोशूट करण्याची विनंती केली आहे. ‘पेटा’चे हे पत्र वाचून सगळीकडे संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्याचबरोबर आता या प्रकाराला घेऊन रणवीरची खिल्ली उडवली जात आहे. 

काय आहे पत्रात?
या पत्रात रणवीर नव्या न्यूड फोटोशूटविषयी ऑफर करताना ‘पेटा’ने रणवीरच्या नुकत्याच हिट ठरलेल्या ‘पेपर मॅगझीन’च्या न्यूड फोटोशूटचा उल्लेख करत त्यावरून आपल्या नव्या जाहिरातीसाठी ‘पेटा’ने रणवीरला न्यूड फोटोशूट करण्याची विनंती केली आहे. यात त्यांनी जाहीरपणे रणवीरला न्यूड फोटोशूटबद्दल विचारले आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *