कधीही न पाहिलेले फोटो, कार्टुन्स अन् बरंच काही, बाळासाहेबांची जीवनपट उलगडणारं मुंबईतील स्मारक नेमकं कसं असेल? | How will be Balasaheb Thackeray National Memorial in Mumbai uddhav thackeray rmm 97मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आपण बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारका’च्या कामाचा आढावा घेतला आहे. आज मुंबईतील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक कसं असेल? याचं सादरीकरण करण्यात आलं आहे.

खरं तर, मागील अनेक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं काम प्रलंबित होतं. हे स्मारक नेमकं कुठे असणार? आणि कसं असणार? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. अखेर हे स्मारक कसं असेल याची सविस्तर तपशील समोर आला आहे. हे स्मारक शिवतीर्थाजवळील महापौर बंगल्याजवळ असणार आहे. एमएमआरडीएकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या स्मारकाजवळ समुद्र किनारा आहे, त्यामुळे सागरी आणि पर्यावरणविषयक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. तसेच हे स्मारक उभारण्यासाठी एकही झाड तोडलं नाही. मुख्य रस्त्यावरून ही वास्तू दिसावी, अशी अट असल्याने त्याप्रमाणे याचं बांधकाम केलं जात आहे.

तसेच या संग्राहलायत नेमक्या कोणत्या आठवणींचा समावेश करावा, यासाठी तीन सदस्यीय अभ्यासगट नेमण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं जीवनपट उलगडून दाखवण्याचं काम या अभ्यासगटाकडून केलं जाणार आहे. २०२३ च्या मध्यापर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे स्मारक जनतेसाठी खुलं केलं जाणार आहे. या स्मारकाचं काम भूमिगत असणार आहे, बाजुलाच समुद्र असल्याने या कामात विलंब होत असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.Source link

Leave a Reply