Kacha Badam Song : ‘काचा बादाम’ गायक भुबन बादायकरने आणखी नवं गाणं….


मुंबई : ‘काचा बादाम’ (Kacha Badam) गाण्याचे गायक भुबन बादायकर (Bhuban Badyakar) अगदी अल्पावधीतच चर्चेत आले. नुकताच भुबन यांचा अपघात झाला. नवीन कार खरेदी केल्यानंतर ती चालवताना त्यांचा अपघात झाला. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातानंतर त्यांच आणखी एक गाणं व्हायरल झालं आहे. या गाण्याने नवा रेकॉर्ड रचला आहे. 

पश्चिम बंगालच्या बोलपुरच्या गोधुली स्टुडिओमध्ये नव्या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं आहे. या गाण्यात त्यांनी आपल्या अपघाताची गोष्ट सांगितली आहे. 

बंगालमध्ये बदाम विकणाऱ्या भुवन बडईकर यांची गाणी ज्या पद्धतीने व्हायरल झाली आहेत, ते सर्वांनाच परिचित आहे. भुबन बडईकरच्या ‘काचा बदम’ या गाण्यावर नाचला नसेल असा क्वचितच कोणी असेल. 

इंस्टाग्राम रीलचा अर्थ आता ‘काचा बदाम’ असा होतो. स्टार्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण ‘काचा बदाम’च्या तालावर नाचत रील बनवत आहेत. भुबन बडईकरने यापूर्वी कोलकाता येथे एक प्रसिद्ध फाइव्ह स्टार शो केला आहे आणि त्याचीही खूप चर्चा होत आहे.

गायकाने सेकेंड हँड गाडी खरेदी केली आहे. कार चालवायला शिकताना हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांनी गाणं लिहिलं आहे. ‘काचा बादाम’ प्रमाणे हे गाणं देखील व्हायरल झालं आहे. 

तसेच भुबन बादायकर यांनी एलीट फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये देखील गाणं गायलं आहे. भुबन बादायकरने कोलकाताच्या पार्क स्ट्रीटमध्ये १८ फेब्रुवारी रोजी गाणं गायलं आहे.Source link

Leave a Reply