K L Rahul | केएल राहुलचा धमाका, मुंबई इंडियन्स विरुद्ध सलग दुसरं शतक


मुंबई : लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन केएल राहुलने (K L Rahul) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध धमाका केला आहे. केएलने मुंबई विरुद्ध सलग दुसरं शतक ठोकलंय. केएलचं हे या मोसमातील सलग दुसरं आणि आयपीएल कारकिर्दीतील हे एकूण चौथं शतक ठरलं. (lsg vs mi ipl 2022 lucknow captain k l rahul again century against mumbai set 169 runs target)

केएलने 61 बॉलमध्ये सिक्स मारत हे शतक पूर्ण केलंय. केएलला शतकासाठी 4 धावांची गरज होती. केएल 60 बॉल खेळून 96 धावांवर नाबाद होता. याचवेळेस केएलने खणखणीत सिक्स मारला आणि शतक पूर्ण केलं. 

केएलने 62 बॉलमध्ये नाबाद 103 धावांची खेळी केली. यामध्ये  त्याने 12 फोर आणि 4 सिक्स खेचले.  याआधी केएलने मुंबई विरुद्धच 16 एप्रिलला  56 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. केएलने त्या सामन्यात चौकार मारत शतक पूर्ण केलं होतं.

मुंबईला 169 धावांचं आव्हान

दरम्यान केएलच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने मुंबईला 169 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या. 

केएल व्यतिरिक्त लखनऊकडून इतर कोणाला विशेष काही करता आलं नाही. मनिष पांडेने 22 धावा केल्या. आयुष बदोनीने 14 धावांचं योगदान दिलं. दीपक हुड्डा आणि क्विंटन डी कॉक या दोघांनी प्रत्येकी 10 धावा केल्या.

मुंबईकडून कायरन पोलार्ड आणि रिले मेरेडिथने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि डॅनिअल सॅम्सने 1-1 विकेट घेतली.

लखनऊ प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, क्रुणाल पांड्या, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, मार्कस स्टोयनिस, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान. 

मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, डेनियल सॅम्स, जयदेव उनादकट, रिले मेरेडिथ आणि जसप्रीत बुमराह. 



Source link

Leave a Reply