‘ज्याला राखी बांधली त्याच्यासोबतच…’, करण मेहराचा पत्नीवर गंभीर आरोप


मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमध्ये ‘नैतिक’ची भूमिका साकारत घराघरात पोहोचणारा अभिनेता करण मेहरा त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता करण मेहरानं पत्नी निशावर Affair असल्याचे आरोप केले आहेत. करणनं केलेले आरोप हे हैरान करणारे आहेत. 

करणनं नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी करणनं निशा त्याला त्याच्या मुलाला भेटू देत नाही आणि त्याच्याच घरात एका दुसऱ्या पुरुषासोबत राहत आहे. आता करणनं या पुरुषाचं नाव उघड केलं आहे, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. करण मेहरानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निशाबाबत धक्कादायक खुलासा केला. करणनं सांगितलं की, त्याची पत्नी निशाचे तिच्या मानलेल्या भावासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. करणनं सांगितले की, निशा आधी रोहित साथियाला तिचा भाऊ मानत होती, त्याला तिनं राखी बांधली होती, पण आता निशाचे त्याच्यासोबत अवैध संबंध आहेत. एवढेच नाही तर निशा आणि रोहित त्याच्याच घरात राहतात.

करणनं असेही सांगितले की, रोहित ज्याच्याशी निशाचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यानं निशाचा मोठा भाऊ म्हणून लग्नात कन्यादान केलं होतं. करण पुढे म्हणाला, ‘मला हे सगळं गेल्या वर्षी कळले, पण त्यावेळी मी काही बोललो असतो तर लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. पुरावे गोळा करायला मला १४ वर्षे लागली. इतकी वर्षे मी लोकांशी बोललो, पुरावा गोळा करत होतो काही गोष्टी मित्रांनी सांगितली काही कोणी आणि हे सगळं माझ्या मुलासमोर झालं.’

करणनं हे देखील सांगितलं की निशानं कंगना रणौतच्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्ये लग्नानंतरही तिचे अफेअर असल्याचे कबूल केले होते. करण म्हणाला, ‘मी म्हणालो असतो तर लोकांनी माझ्यावर आरोप करण्याऐवजी त्यांनी माझ्यावरच आरोप केले असते. मी आता हे सगळं पुराव्यांसोबत बोलतो की निशा रोहनसोबत राहते आणि या तिच्या या संबंधाला भाऊ-बहिणीचे नाते आहे असं म्हणतात. करणनं हे देखील सांगितलं की त्याला अनोळखी नंबरवरून जिवेमारण्याची धमकी देखील मिळत आहे.’

गेल्या वर्षी करण मेहरा आणि निशा रावल यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आले होते. तेव्हा या दोघांनी एकमेकावर अनेक गंभीर आरोप केले होते. निशाने करणवर मारहाणीचे आरोप केले, तसेच निशानं तिच्या डोक्यावरून रक्त वाहत असतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. Source link

Leave a Reply