ज्या खेळाडूमुळे भारतीयांच्या डोळ्यातं आलं होतं पाणी ‘तो’ पुन्हा येतोय!


T20 World Cup New Zealand Squad​ : टी-20 वर्ल्डकपचा (T20 World Cup 2022) थरार येत्या ऑक्टोंबर महिन्यापासून सुरू होणार आहे. आतापर्यंत जवळपास प्रत्येक देशाने आपला संघ जाहीर केला आहे. अशातच भारताचा 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या (ODIWorld Cup 2019)  सेमी फायनलमध्ये पराभूत करणाऱ्या किवींनी म्हणजेच न्युझीलंडने आपला टी-20 वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारतासाठी नेहमी धोकादायक ठरणारा खेळाडूचाही संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.  (New zealand Announced squad for t20 World Cup 2022 Martin Guptill Kane Williamson)

तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून न्युझीलंड संघाचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुप्टिल (Martin Guptill) आहे. गुप्टिल हा खेळाडू प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहणार आहे. 2019 च्या वर्ल्डकपवेळी महेंद्र सिंह (Mahendra Singh Dhoni) धोनी दोन धावा घेत असताना मार्टिन गुप्टिलने केलेले थ्रो डायरेक्ट स्टम्पवर बसला होता. ज्यावेळी थ्रो बसला तेव्हा लेग अम्पायरनेही थोडावेळ थांबत थर्ड अम्पायरकडे निर्णय सोवपला होता. 

थर्ड अम्पायरने (Third Umpire) स्क्रीनवर पाहिलं तेव्हा महेंद्र सिंह धोनी रनआऊट (Mahendra Singh Dhoni Run Out) झालेला दिसला. गुप्टिलचा थ्रो हा फक्त धोनीला बाद करून नव्हता गेला.130 कोटी भारतीयांच्या काळजात धस्स झालं होतं, कारण धोनी बाद झाल्यानंतर भारताचा पराभव निश्चित झाला होता. सर्व भारतीय नाराज झाले होते, अनेक क्रिकेट फॅन्स अक्षरक्ष: रडत होते. धोनीही जाताना रडत असल्याचं स्क्रीनमध्ये दिसत होतं. रोहित शर्माही रडलेला दिसला कारण ते फक्त अश्रू नव्हते तर ती एक सल आणि वेदना होती जी प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहणारी आहे. 

मार्टिन गुप्टिलचा न्युझीलंडच्या वर्ल्ड कप स्कॉडमध्ये समावेश असून तो 7 वा विश्वचषक खेळणारा खेळाडू ठरणार आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) 6 टी-20 वर्ल्डकप खेळण्याचा विक्रम गुप्टिल मोडणार आहे. मार्टिन गुप्टिलने  भारताविरूद्ध 16 टी-20 मॅचमध्ये 380 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा सर्वाधिक धावसंख्या 70 इतकी आहे. टी-20 वर्ल्डकपचा पहिल सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये 22 ऑक्टोंबरला सिडनी इथं खेळवला जाणार आहे.

T20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ:

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन ऍलन.

 Source link

Leave a Reply