Headlines

Jos Buttler | जॉस बटलरची कमाल, हवेत झेपावत शानदार कॅच

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 52 वा सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (PBKS vs RR) यांच्यात खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. पंजाबने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला आलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली. मात्र राजस्थानच्या जोस बटलरने (Jos Buttler) घेतलेल्या शानदार कॅचमुळे पंजाबला पहिला झटका बसला. (pbks vs rr ipl 2022 rajsthan royals jos buttler take sensetional one handed catch of shikhar dhawan)

बटलरने हवेत उडी घेत शिखर धवनचा एकहाती अफलातून कॅच घेतला. शिखर 12 धावा करुन माघारी परतला. बटलरने घेतलेल्या या कॅचचा व्हीडिओ व्हायरल होतोय. 

बटलरने असा घेतला कॅच

सामन्यातील सहावी आणि पावर प्लेमधील शेवटची ओव्हर आर अश्विन टाकायला आला. या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर धवनने जोरदार फटका मारला. 

मिड ऑनच्या दिशेला उभ्या असलेल्या बटलरने हा हवेत असलेला बॉल अचूक हेरला. बटलरने शेवटपर्यंत बॉलवर लक्ष ठेवलं. बटलरने बॉल जवळ येताच अचूक हवेत उडी घेत उजव्या हाताने हा शानदार कॅच घेतला. यासह पंजाबला पहिला धक्का बसला.

राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, जॉस बटलर, यशस्वी जायसवाल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन.  

पंजाब किंग्सची प्लेइंग इलेव्हन :  मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह आणि संदीप शर्मा.  

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *