Headlines

“जीवाभावाची शिवसेना सोडून गेलेले…,” जयंत पाटलांनी वर्तवलं भाकित; म्हणाले “पावसाळा संपेपर्यंत थांबायला हवं होतं” | NCP Jayant Patil on Eknath Shinde Devendra Fadanvis Cabinet Monsoon Flood Shivsena sgy 87

[ad_1]

गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “ज्याअर्थी करत नाही, त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जीवाभावाची शिवसेना सोडून गेले असल्याने तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असं वाटत नाही, त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे”.

Uddhav Thackeray Interview: करोनावर मात ते शिंदेंची बंडखोरी, पाहा उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखत

“राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. राज्यात पूरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. त्या भागात पालकमंत्री नाहीत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने फक्त दोन मंत्री आहेत. परंतु गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात आहे,” अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘पालापोचाळा’ म्हटल्याने भाजपा संतापली, आशिष शेलार म्हणाले “तुमचे लवंडे…”

“राज्यात पूरपरिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री तिथे ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्हया- जिल्हयात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे,” असंही जयंत पाटील म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *