Headlines

जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर ठाण्यात तणाव, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार | thane police made lathi charge on ncp activist after jitendra awhad arrest

[ad_1]

राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला होता. याप्रकरणीच त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या अटकेचा राष्ट्रवादीने निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे. याबाबतचे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिले आहे.

हेही वाचा >>> “जितेंद्र आव्हाडांना यापूर्वीच तडीपार केलं असतं तर…” केतकी चितळेचे पोलिसांना पत्र

ठाण्यात पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. अटकेनंतर जितेंद्र आव्हाड यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेले जात होते. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांच्या वाहनांसमोर आले. याच कारणामुळे पोलिसांना या कार्यकर्त्यांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांच्या या कारवाईमुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा >>> “खूप झालं आता! यांच्यावर खटले चालवले जातील, हा तळतळाट…” शिंदे गटाविरोधात संजय राऊत पुन्हा आक्रमक

दरम्यान, या अटकेच्या कारवाईनंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी फासावरही जाण्यास तयार आहे. या अटकेने मला काही फरक पडत नाही, असे आव्हाड म्हणाले आहेत. तर आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी “जितेंद्र आव्हाडांविरोधात ज्यांनी कुणी गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्यापैकी कुणीही घटनास्थळी उपस्थित नव्हतं. संबंधित सर्व घटना अवघ्या ७ मिनिटांत घडली आहे. त्यामुळे ‘तुम्ही तक्रारदार व्हा’ असे म्हणत चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांवर आणि विवीयाना मॉलच्या व्यवस्थापकावर दबाव टाकला जात आहे,” असा आरोप जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *