Headlines

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर रोहित पवार आक्रमक, म्हणाले “…तर ती आश्चर्याची बाब आहे”| ncp leader rohit pawar criticizes arrest of jitendra awhad opposing har har mahadev film

[ad_1]

‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले होते. दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील या अटकेचा निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध केला जात असताना अटक करण्यात येत असेल तर हे चुकीचे आहे, असे रोहित पवार म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा >>> जितेंद्र आव्हाडांना अटक होताच मनसेची प्रतिक्रिया; म्हणाले, “आयुष्यभर जेलमध्ये…”

“जितेंद्र आव्हाड मॉलमधील चित्रपट बंद करण्यासाठी गेले होते. मात्र काही अडचण येऊ नये म्हणून आव्हाड तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लोकांना मदत करत होते. एक तर ‘हर हर महादेव’ हा चित्रपट इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट खरं तर राज्य सरकारने बंद करायला हवा होता. मात्र सरकार याबाबतीत एक प्रश्नदेखील विचारत नाही. जितेंद्र आव्हाड मॉलमध्ये जाऊन लोकांना संदेश देत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा दृष्टीकोन ठेवून आव्हाड गेले होते. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असेल, तर ती आश्चर्याची बाब आहे, असे रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा >>>“मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं”, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम, म्हणाले “फाशी दिली तरी…”

“भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटातील एका आमदाराने गोळीबार केला. मात्र या आमदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला जातोय, म्हणून एखादा चित्रपट थांबवल्यावर कारवाई केली जात आहे. ही आश्चर्याची बाब आहे. पोलीस यंत्रणेच्या मदतीने महाराष्ट्राचा आवाज दाबणार आहात का? माझा महाराष्ट्र कोठे नेऊन ठेवला आहे?” असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *