जीमला जाण्याऐवजी राखी सावंतचं भलतंच काम; Video शेअर करत, म्हणाली…


मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. राखी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच राखीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

राखीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओत राखी जीमला जात असल्याचं म्हणते. ‘ मी ६ वाजता पोहोचली तर किक बॉक्सिंगच्या सरांसोबत कॉफी प्यायला जाते. माझ्याकडे अर्धा तास आहे. माझ्याकडे अर्धा तास आहे आणि बाईक राईडची मज्जा वेगळीच आहे’, असं राखी बोलते. 

व्हिडीओ शेअर करत राखीनं कॅप्शन दिलं की, ‘आज सकाळी मी लवकर जिमला गेले. जिम बंद होती, त्यामुळे मी माझ्या किक बॉक्सिंगचे सर राजू दास यांच्यासोबत कॉफी घ्यायला गेले होते.’ राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ड्रामा क्वीनच्या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.

राखीच्या खासगी आयुष्या विषयी बोलायचे झाले तर, आजकाल राखी दुबईस्थित बिझनेसमन आदिलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. बऱ्याचवेळा ते दोघं एकत्र दिसतात. राखी आणि आदिलची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. आदिल विषयी बोलताना राखी म्हणाली की, ‘असं वाटतं की देवानं माझ्यासाठी त्याला पाठवलं आहे.’ दरम्यान, राखीचा नागपंचमीच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. Source link

Leave a Reply