जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


अमरावती, दि. 30 : गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उत्कृष्ट  शालेय इमारती, वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांनी सुसज्ज रुग्णालये यासह इतर भौतिक सुविधा, अद्ययावत व्यायामशाळा, परिसराचे सौंदर्यीकरण, सभागृहे, विश्रामगृहे, ग्रामपंचायत इमारती आदींची निर्मिती करतांना जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

विविध योजनेअंतर्गत 17 कोटी 85 लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये  विकासकामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी.

गावातील नागरीकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले. मोर्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे आदी उपस्थित यावेळी होते.

मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी  येथे 1 कोटी रुपये प्रमाणे प्राप्त निधीतून तळणी पिंपळखुटा रस्त्यावर 2 लहान पुलाच्या कामांचे भूमीपुजन, जिल्हा वार्षिक योजनेतुन प्राप्त सुमारे 60 लक्ष रुपयांच्या निधीतून पशुवैद्यकीय दवाखाण्याचे बांधकाम व वॉर्ड क्रमांक 1 ते 2 मधील बाबाराव टेकाम ते सुधाकर उईके यांच्या घरापर्यंतचे 10 लक्ष रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण,10 लक्ष रुपयांच्या निधीतून मुस्लिम कब्रस्तानचे बांधकाम व  सौंदर्यकरणचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. यावेळी सरपंच पल्लवी मानकर, उपसरपंच पद्मताई डोळस आदी उपस्थित होते.

मोर्शी तालुक्यातील शिरलस येथे 10 लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत  भवनाचे व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नागरी सुविधा केंद्राचे  लोकार्पण, 8 लक्ष रुपयांच्या निधीतून व्यायाम शाळेचे लोकार्पण, शाळा वर्ग खोली दुरुस्तीचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी सरपंच निपेश चौधरी, उपसरपंच अमोल देशमुख, सदस्य रमेश काळे, सुरेंद्र राहते, कमला तायडे, रेणुका टेकाम, अभय आठवले उपस्थित होते

नेरपिंगळाई-लिहीदा-नया वाठोडा-पिंपळखुटा-पाडी कि.मी.0/00 ते 9/500 मध्ये सुधारणेच्या 4 कोटी 25 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भुमीपुजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

मोर्शी येथील उदखेड-खोपडा-शिरखेडा रस्त्याच्या 1 कोटी 25 लक्ष रुपयांच्या निधीतून  सुधारणा कामाचे भुमीपुजन करण्यात आले. यावेळी सरपंच मीना मोहोड, उपसरपंच उज्वला देशमुख, सदस्य ललिता गावंडे, शकिरा बानो आदी उपस्थित होते.

धामणगाव येथील पशुवैद्यकीय  दवाखान्याच्या 60 लक्ष रुपयांच्या प्राप्त निधीतून बांधकामाचे लोकार्पण केले यावेळी सरपंच सुनील अडायके, उपसरपंच पुरुषोत्तम कळसकरआदी उपस्थित होते. धामणनगाव-पोरगव्हाण-विष्णोरा रस्ता सुधारणेच्या 2 कोटी 40 लक्ष रुपयांच्या प्राप्तनिधीतून कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. पोरगव्हाण येथील काशी नदीवरील पुल व लेंडी नाल्यावरील पुलाचे 2 कोटी 50 लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या बांधकामाचे भुमीपुजन यावेळी करण्यात आले. पोरगव्हान च्या सरपंच माया कोकणे, उपसरपंच इंद्रीस भाई पटेल सदस्य दिनकर पुंड, निलेश कोकाटे उपस्थित होते.

बेलोरा-काटसूर-अडगांव-रस्त्याचे 1 कोटी 20 लक्ष रुपये निधीतून सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच अडगांव-तळेगांव-खेड झायवाडा-पिंपरी गणेशपूर मार्गावरील असलेल्या लहान पुलाचे बांधकाम 3 कोटी रुपये निधीतून करण्यात येत आहे. या दोनीही कामाचे  भुमीपुजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

पूल निर्माण करतांना त्याची उंची योग्य प्रमाणात असावी व पूल मजबूत असावा असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. सरपंच मंगला लोखंडे, उपसरपंच किशोर आमले व सदस्य रंगराव बनसोड आदी उपस्थित होते.

शिरजगाव-मंगरूळ-घोडगव्हाण ते रोहणखेडा-धामनगाव येथे पेढी नदीवरील पुलाचे 50 लक्ष रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामाचे, तेथिल नाल्याच्या  संरक्षण भिंतीचे 50 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व गोरळ ते शिराजगाव येथील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत प्राप्त 90 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या  दोन रस्ता सुधारण्याच्या कामाचे  भुमीपुजन श्रीमती ठाकूर यांनी केले. सरपंच सुनील गोटे, उपसरपंच संजय देशपांडे उपस्थित होते.

मंगरूळ-भिल्लापूर येथील 40 लक्ष रुपयांच्या निधीतून होणाऱ्यारस्ता सुधारण्याच्या  कामाचे व भिलापूर-जमनापूर रस्ता सुधारण्याचे कामाचे भुमीपुजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

000

Source link

Leave a Reply