‘झाले झाले सज्ज मराठे सरसावूनी भाले…’ अंगावर काटा आणणारा ‘पावनखिंड’चा हा Video एकदा पाहाच


मुंबई : ‘आले आले गनिम खिंडीत चवताळूनी आले ….. झाले झाले सज्ज मराठे सरसावूनी भाले…’ असे शब्द कानी पडतात आणि एका अशा प्रसंगाची झलक डोळ्यांसमोर उभी राहते ज्यामधून महाराष्ट्रावर गनिमांचा डोळा पडला तेव्हा मावळ्यांच्या साथीनं राजांनी केलेला पराक्रम पाहायला मिळतो. 

पन्हाळगडावर असणाऱ्या लेकरांसाठी चिंचातुर असणाऱ्या आऊसाहेबांना पाहताना एका धाडसी आईचं काळीजही चिंतेनं पाणी झाल्याचं लक्षात येतं. 

शिवबांच्या छत्रछायेमध्ये महिलांना फक्त आदरच नव्हता, तर त्यांनाही रणरागिणी होण्याची जणू तालिमच मिळाली होती, याची पोचपावती ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर पाहताना मिळते. (Pawankhind Official Traile)

‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ यांसारख्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा इतिहासाच्या पेटाऱ्यातून असा नजराणा घेऊन आले आहेत, जो अनुभवण्यासाठीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 

समोर गनिम उभा असताना पावनखिंडीमध्ये झालेला रणसंग्राम मराठ्यांनी कसा गाजवला आणि त्या क्षणी नेमकं काय घडजलं होतं, याचं चित्र कलाकारांनी इथं उभं केलं आहे. 

मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, प्राजक्ता माळी, समीर धर्माधिकारी, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग आणि सहकलाकारांच्या अभिनयाचा नजराणा असणारा हा चित्रपट 18 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तिथपासून ते अगदी एक एक गड जिंकत प्रत्येक ठिकाणी स्वराज्याची पताका उंचावण्यापर्यंतचा हा प्रवास कोणालाही अभिमान वाटावा असाच होता. 

यावर बऱ्याच कलाकृतीही साकारण्यात आल्या. ‘पावनखिंड’ हेसुद्धा याच सुवर्ण इतिहासातील एक पान. 

या ऐतिहासिक कलाकृतीसाठी तुम्हीही तुमाचा वेळ नक्कीच राखून 
ठेवा… आणि म्हणा, हरssss हर…. महादेव….‍!Source link

Leave a Reply