झगमगत्या विश्वात लगीनघाई; आणखी एक सेलिब्रिटी कपल अडकलं विवाहबंधनात


Gautham Karthik -Manjima Mohan : झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाच्या चर्चा रंगत असताना दाक्षिणात्या कलाक्षेत्रातील गौतम कार्तिक (Gautham Karthik ) आणि मंजिमा मोहन (Manjima Mohan) यांनी लग्न केल आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रुपेरी पडद्यावर आपल्या प्रेमाची जादू प्रेक्षकांना दाखवल्यानंतर खाऱ्या आयुष्यात गौतम-मंजिमा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं आहे. (karthik gautham photo)

गौतम कार्तिक (Gautham Karthik Wedding) आणि मंजिमा मोहन (Manjima Mohan) यांनी 28 नोव्हेंबर रोजी लग्न केलं. आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा सेलिब्रिटी कपलने सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या फोटोंची चर्चा आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटी कपलला लग्नबंधनात अडकल्याचं पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

गौतम – मंजिमा यांनी  कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत नव्या आयुष्याला सुरुवात केली. चैन्नईच्या भव्य हॉटेलमध्ये गौतम आणि मंजिमा यांचं लग्न मोठ्या थाटात पार पडलं. एवढंच नाही तर या लग्नात (wedding) अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. 

वाचा | Shreya Bugde ची ‘गुडन्यूज’ ऐकून चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

 

मणिरत्नम, गौतम मेनन, अभिनेते विक्रम प्रभू, आरके सुरेश, शिवकुमार, ऐश्वर्या रजनीकांत, अशोक सेल्वन, आधि आणि निक्की गलरानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी लग्नाला उपस्थित होते. गौतम आणि मंजिमा उटी आणि चेन्नई या दोन्ही ठिकाणी रिसेप्शनचं आयोजन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (gautham karthik love photos)

मंजिमा मोहनने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘आता आणि नेहमीसाठी…’ असं लिहिलं आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी दोघांचे प्रि-वेडींग फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.  2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘ देवरत्तम’ (Devarattam) सिनेमाच्या माध्यमातून दोघे एकत्र दिसले. (gautham karthik family photos)Source link

Leave a Reply