Headlines

जीवाच्या आकांतानं रडतेय Deepika; कारण वाचून हैराण व्हाल

[ad_1]

मुंबई : दीपिकानं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली आणि जागतिक स्तरावर नव्यानं सर्वांची मनं जिंकली. कान्सच्या मंचावर दीपिका ज्युरी म्हणून हजर राहिली आणि भारतीयांची मान अभिमानानं उंचावली. एक अभिनेत्री आणि एक सौंदर्यवती म्हणून ती जेव्हा जेव्हा रेड कार्पेटवर आली, तेव्हा तिचा लूक आणि स्मितहास्य सर्वांनाच घायाळ करुन गेला. (Deepika Padukone at cannes)

अशी ही दीपिका कान्सवरून निघताना मात्र काहीशी उदास दिसली. Its a wrap असं म्हणत तिनं एक व्हिडीओसुद्धा इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये दीपिका ढसाढसा रडताना दिसली. 

तिच्या चेहऱ्यावर असणारी हसरी रेष चक्क दु:खात रुपांतरीत झाल्याचं पाहायला मिळालं. फत्त दीपिकाच नव्हे, तर तिच्या आजुबाजूला असणारेही असेच रडताना दिसले. 

बाप रे! दीपिकासोबत नेमकं काय घडलं की ती आणि तिच्या आजुबाजुचेही इतके रडायला लागले? पाहणाऱ्यांना हा एकच प्रश्न पडला. 

तुम्हालाही हाच प्रश्न सतावत असेल, तर आधी हा व्हिडीओ पुन्हा एकदा पाहा. कारण, इथं दीपिका खरीखुरी रडत नाहीये, तर एका फिल्टरमुळं सर्वजणांचा चेहरा रडवेला दिसत आहे. 

इन्साग्रामवर असणाऱ्या असंख्य फिल्टर्सपैकी हासुद्धा असाच एक फिल्टर. सध्या या फिल्टरचा ट्रेंड चांगलाच पाहायला मिळत आहे. सर्वजण या ट्रेंडच्या पोस्ट करताना दिसत आहेत. 

दीपिका तरी मग कशी मागे राहिल? तिनंही या ट्रेंडचा एक व्हिडीओ शेअर केला आणि सर्वांनाच पेचात पाडलं. तुम्हाला कसा वाटतोय हा व्हिडीओ? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *