जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वॉरंट; राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच गुन्हा नोंदराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना इस्लामपूर न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आला आहे. पाच वर्षांपूर्वी पाटील यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वारंवार समन्स देऊनही न्यायलयात हजर न राहिल्यामुळे इस्लामपूर न्यायलयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. त्यानंतर जयंत पाटील यांना न्यायलयात हजर राहत वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता करावी लागली. राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदा जयंत पाटील यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा- एकनाथ शिंदे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार; शंभूराज देसाई यांचा गौप्यस्फोट

काय आहे प्रकरण ?
जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात जयंत पाटलांनी शिरगाव रसत्यावर ठिय्या आंदोलन केले होते. जमाबवंदी आदेशाचा भंग केल्यामुळे आष्टा पोलिसांनी जयंत पाटलांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पाटील यांच्यासोबत राजेंद्र भासर, राजेंद्र भासर, स्वरुपराव पाटील, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील , शरद गायकवाड, मोहन गायकवाड, यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा- “आदित्य ठाकरे वाघच पण..,” शिंदे गटातील आमदार सुहास कांदेंची खोचक टीका

न्यायलयात हजेरी लावत जामीनाची पूर्तता
तसेच या प्रकरणी इस्लामपूर न्यायलयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स बजावूनही न्यायलयात हजर न राहिल्यामुळे जयंत पाटील यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी इस्लामपूर न्यायलयात हजेरी लावत जयंत पाटील यांनी वारंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली.

Source link

Leave a Reply