जवळच्या व्यक्तीसोबत जान्हवी कपूर घालवतेय खास क्षण, मिस्ट्री बॉयची सर्वत्र एकच चर्चा


मुंबई : सोशल मीडियावर लोकांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करायला फार आवडते. कारण येथे त्यांना आपले आवडते सेलिब्रिटी काय करत आहेत हे पाहायला मिळते. सध्या  जान्हवी कपूर सध्या सुट्टीवर आहे आणि ती आपली सुट्टी आपल्या जवळच्या मित्रांसोबत घालवत आहे. यादरम्यानचे जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो स्वत: अभिनेत्रीने पोस्ट केले आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

खरंतर जान्हवीने तिच्या जवळच्या व्यक्तींसोबत फोटो शेअर केल्यामुळे, हे फोटो चर्चेचा विषय ठरले. तसेच जान्हवी या सुट्टीमध्ये बराच वेळ एका मेल मित्रासोबत घालवताना दिसली, ज्यामुळे जान्हवी कपूर कोणत्या मिस्ट्री बॉयसोबत फिरत आहे. असे प्रश्न उपस्थीत केले जात आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिचा मित्र ओरहान अवतारमाणीसोबत तामिळनाडूमध्ये सुट्टी घालवत आहे. तिच्या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती तिची बहीण खुशी कपूरला कंपनी देण्यासाठी तेथे गेली होती.

खुशी कपूर झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ कॉमिक्समध्ये काम करत आहे. दुसरीकडे, जान्हवी कपूर देखील काही काळापासून बॉलीवूड इंडस्ट्रीत आहे, परंतु तिने अद्याप स्वतःचे स्थान निर्माण केलेले नाहीत.

या छायाचित्रात ती हिरव्यागार चहाच्या बागांमध्ये उभी असलेली दिसत आहे. या दरम्यान, तिने तपकिरी पँटसह स्टाइल केलेला पांढरा रिबड क्रॉप टॉप घातला आहे.

यासोबत तिने गळ्यात स्कार्फ बांधला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. तसेच जान्हवीने नो मेकअप मेकअप  लुक तयार केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.Source link

Leave a Reply