Headlines

Shani Dev: ‘या’ देवांची भक्ती करणाऱ्या जातकांवर शनिदेवांची असते कृपा

[ad_1]

Shani Dev Krupa: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं वेगळं असं स्थान आहे. शनिदेवांचा प्रभाव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशा-अंतर्दशा यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायाधीशांचा दर्जा दिला गेला आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. पण ज्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. शनिदेव रंकाला राजा बनवू शकतात. शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. असं असताना तीन देवांच्या भक्तांना शनिदेव (Shani Dev) त्रास देत नाही. शनि अडीचकी, साडेसाता या काळातही प्रभाव कमी असतो. चला जाणून घेऊयात तीन देवता कोणत्या आहेत. 

पौराणिक कथेनुसार, शनिदेव कर्मनुसार फळ देतात. प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या वाईट कर्माचं हिशोब शनिदेव ठेवतात. त्यानुसार एकदा राशीला आले की, फळ देतात. पुढच्या वर्षी म्हणजेच 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. या गोचरानंतर मकर राशीला शेवटची अडीच वर्षे, कुंभ राशीला मधली अडीच वर्षे आणि मीन राशीला सुरुवातीची अडीच वर्षे सुरु होतील. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु होईल. तर धनु राशीची साडेसातीतून, मिथुन आणि तूळ राशीची अडीचकीतून मुक्तता होईल. 

जर तुम्ही भगवान कृष्णाची (God Krishna) भक्ती करत असाल तर शनिदेव या काळात शुभ फळ देतात. कारण शनिदेव भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात. शनिदेवांनी मथुरेच्या कोसीकलाच्या कोलिकावनमध्ये श्रीकृष्णाची कृपा व्हावी म्हणून तपस्या केली होती. यानंतर कोकिळेच्या रुपात त्यांना दर्शन दिलं होतं. त्यामुळे श्रीकृष्णाची पूजा करणाऱ्यांना शनिदेव चांगलं फळ देतात. 

बातमी वाचा- Surya Gochar 2023: पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ‘या’ राशींवर असेल सूर्यदेवांची कृपा, उद्योग आणि करिअरसाठी अनुकूल काळ

भगवान शिवाच्या भक्तांवर (God Shiva) शनिदेवांची विशेष कृपा असते. धार्मिक ग्रंथानुसार, वडील सूर्यदेवांनी शनिदेव आणि त्यांची आई छाया यांचा अपमान केला होता. त्यानंतर शनिदेवांनी भगवान शिवांची तपस्या करून त्यांचा आशीर्वाद मिळवला होता. त्यानंतर भगवान शिवांनी त्यांना ग्रहांचा न्यायाधीश म्हणून दर्जा दिला. यामुळे भगवान शिवांची पूजा करणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाहीत.

बातमी वाचा- …नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच

शनिवार आणि मंगळवारी शनिदेवांसह मारुतिरायाची (God Hanuman) पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार एकदा शनिदेवांना आपल्या शक्तिचा गर्व झाला होता. तेव्हा मारुतिरायांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला होता. तेव्हा शनिदेवांनी मारुतिरायांना वचन दिलं होतं की त्यांच्या भक्तांना कधीच त्रास देणार नाहीत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *