Headlines

Jasprit Bumrah च्या फिटनेसबाबत मोठी बातमी; T20 खेळणार की नाही?

[ad_1]

Jasprit Bumrah Fitness : भारतीय संघ (Team India) आज (23 सप्टेंबर)  दूसऱ्या T20 सामन्यासाठी नागपुरमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या T20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत नागपुरातील पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा विचार करू शकतात, असेही मानले जात आहे.   

तर दुसरीकडे भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फीट कधी होणार असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. आता तरी बुमरा दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात खेळणार की नाही, याबाबत भारतीय क्रिकेटपटूने स्पष्ट उत्तर दिले आहे. 

जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इंग्लंड दौऱ्यात पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आशिया कपमध्ये खेळू शकला नव्हता. दरम्यान बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला (team India) टी-20 मध्ये 209 धावाही राखता आल्या नाहीत. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाने मोहाली लढतीत हे आव्हान अगदी सहज चार चेंडू राखून पार केले. ज्यामुळे पाहुण्यांना तीन लढतींच्या मालिकेत 1-0 आघाडी मिळाली आहे. अक्षर पटेलचा (akshar patel) अपवाद वगळता भारताच्या सगळ्या गोलंदाजांनी अकरापेक्षा जास्त सरासरीने धावा दिल्या. 

जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) पाठदुखीमुळे आशिया कपदरम्यान विश्रांती देण्यात आली होती. आता ऑस्ट्रेलिया तसेच द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी बुमराह भारतीय संघात परतला आहे. ‘संघातील बुमराहचे महत्त्व आपण सगळेच जाणतो. होय सध्या भारताची गोलंदाजी चिंतेची बाब ठरते आहे, पण बघू… यावरही उपाय काढता येईल. आम्हाला गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. सध्या संघात देशातील सर्वोत्तम 15 खेळाडूंचा समावेश आहे. सर्वोत्तम आहोत, म्हणूनच संघात आहोत’, असे सांगत हार्दिकने गोलंदाजांची पडती बाजू सावरून घेतली. 

तसेच पहिल्या T20 सामन्यात भारताला जसप्रीत बुमराहची उणीव भासली होती. अशा स्थितीत तो पहिला सामना खेळू शकला नाही. आता सूर्यकुमार यादवनं जसप्रीत बुमराहच्या फिटनेसची चिंता फेटाळून लावली आहे. काळजी करण्यासारखं काहीच नसल्याचंही म्हटलंय. 

बुमराहबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, संघातील वातावरण चांगलंय. सर्व खेळाडू दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त आणि तयार आहेत.  बुमराह पूर्णपणे तयार आहे, काळजी करू नका.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *