Janhvi Kapoor पहिल्यांदाच वडिलांसोबत करणार स्क्रिन शेअर


मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आगामी सिनेमा ‘गुड लक जेरी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘गुड लक जेरी’ शिवाय जान्हवी अनेक सिनेमांमधून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. जान्हवी पहिल्यांदाच वडील बोनी कपूर यांच्या ‘मिली’ सिनेमात दिसणार आहे. जान्हवीने सिनेमाची शूटिंगही पूर्ण केली आहे. पण सर्वात मनोरंजक बातमी म्हणजे ती लवकरच वडील बोनी यांच्यासोबत एका प्रोजेक्टमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार,  वडील आणि मुलगी दोघेही एका जाहिरातीत एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघेही लवकरच जाहिरातीचे शूटिंग सुरू करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

पिंकविलाच्या मते, जान्हवी आणि तिचे वडील बोनी मुंबईत शूटिंग करणार आहेत. त्यामुळे जान्हवीच्या चाहत्यांना आता अभिनेत्रीच्या आणि वडिलांच्या जाहिरातीची प्रतीक्षा आहे. 

जान्हवीच्या आगामी ‘मिली’ सिनेमात अभिनेता सनी कौशल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय जान्हवी राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये दिसणार आहे.

जान्हवी सध्या पॅरिसमध्ये अभिनेता वरुण धवनसोबत ‘बवाल’ सिनेमाचं शुटिंग करताना दिसत आहे. तर दुसरीकडे, बोनी कपूर (Boney Kapoor) लव रंजनच्या आगामी सिनेमातून अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे.

सिनेमात अभिनेत्री रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचं शूटिंग स्पेनमध्ये सुरू आहे. सेटवरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

 

 

 

 Source link

Leave a Reply