Headlines

जालन्यात मोठी कारवाई! स्टील कारखानदारांच्या घरी सापडलं तब्बल ३९० कोटींचं घबाड, १३ तास अधिकारी मोजत होते पैसे | Jalna Income Tax Raid on Steel Manufacturers Seized 390 crores sgy 87

[ad_1]

जालन्यात प्राप्तिकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चार स्टील कारखानदारांच्या घरांवर छापा टाकल्यानंतर तब्बल ३९० कोटींचं घबाड सापडलं आहे. घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम तसंच ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची कागदपत्रं सापडली आहेत. १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, अधिकारी जवळपास १३ तास रोख रक्कम मोजत होते.

जालन्यामधील चार स्टील कारखानदारांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने १ ऑगस्टला या स्टील कारखानदारांच्या घरं आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती.

छापे टाकले असता एकूण ३९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचं उघड झालं. यामध्ये ५८ कोटींच्या रोख रकमेसह, सोन्याचे दागिने, हिरे तसंच ३०० कोटींच्या स्थायी मालमत्तेचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाने सर्व मालमत्ता जप्त केली असून, कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे. दरम्यान यामध्ये औरंगाबादमधील एका व्यापाऱ्याचाही समावेश आहे.

रोख रक्कम जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास मोजणी सुरु होती. स्टेट बँकेत सकाळी ११ वाजता सुरु केली मोजणी रात्री १ वाजेपर्यंत सुरु होती. राज्यभरातील आयकर विभागाचे २६० अधिकारी, कर्मचारी या कारवाईच सहभागी झाले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *