Headlines

जगज्जेत्या Team India च्या सर्व खेळाडूंचा क्रिकेटला अलविदा; उरला फक्त एक, ओळखलं का तो कोण?

[ad_1]

मुंबई : भारतामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या क्रिकेटलया खेळाविषयी नवं काय आणि किती सांगावं अशीच अवस्था. अगदी गल्लीबोळात बॉक्स क्रिकेट खेळणारा असो किंवा मैदानावर फटकेबाजी करणारा कुणी असो, क्रिकेटचा विषय निघाला की इथं सर्वांचं झुकतं माप. (Team india cricket)

अशा या खेळाला आणि त्यावर असणाऱ्या प्रेमाचा खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा चार चाँद लागले जेव्हा महेंद्रसिंह धोनी, याच्या कर्णधारपदामध्ये भारतीय क्रिकेट संघानं 2011 चा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक जिंकला.

अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवत भारतीय संघानं बाजी मारली आणि तेव्हापासून हा विजय आजपर्यंत कायमच सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव आणून गेला.

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, जहीर खान अशा अनेक खेळाडूंची या संघात वर्णी लागली होती. पण, आता हे सर्वच क्रिकेटमध्ये सक्रिय नाहीत. अर्थात त्यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

2011 मध्ये भारतीय क्रिकेट संघातील प्लेइंग इलेव्हनचा एक भाग असणाऱ्या 11 खेळाडूंपैकी 10 खेळाडू क्रिकेटच्या वर्तुळातून बाहेर पडले आहेत. पण, एक असा खेळाडू आहे, जो अद्यापही भारतीय संघासाठी क्रिकेट खेळत आहे. 2023 मधील विश्वचषकही तो खेळण्याची चिन्हं आहेत.

2023 काय घेऊन बसलात, तो 2027 चा क्रिकेट विश्वचषकही खेळू शकतो असं म्हटलं जात आहे. हा खेळाडू म्हणजे विराट कोहली.

विराटनं 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. भारतासाठी तो 2011, 2015 आणि 2019 हे विश्वचषक खेळला. विराटचा फिटनेस आणि खेळामध्ये असणारं सातत्य पाहता तो 2023 आणि 2027 चा विश्वचषकही खेळेल असं म्हटल्याच अतिशयोक्ती ठरणार नाही.

सध्या विराट 33 वर्षांचा आहे. 2027 पर्यंत त्याचं वय 38 वर्षे असेल. त्याचं सध्याचं व्यक्तीमत्वं आणि शरीरयष्टी पाहता पुढचा विश्वचषकही त्याच्यासाठी कठीण लक्ष्य नसेल.

विराटच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यानं संघातील नवख्या खेळाडूपासून ते अगदी कर्णधारपदारपर्यंतची कामगिरी पार पाडली. पाहता पाहता सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही त्याचा गौरव करण्यात आला. असा हा खेळाडू जर खरंच 2027 पर्यंत संघाकडून खेळला तर, ही कौतुकास्पद बाब असेल.

काही आठवणी…

2011 मधील क्रिकेट विश्वचषक भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील संयुक्त यजमानीमध्ये पार पडला होता. 1983 मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

यानंतर 28 वर्षी भारतीय संघानं पुन्हा इतिहास रचला. सोबतच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजनंतर भारतीय क्रिकेट संघ हा दोन किंवा त्याहून अधिकवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या संघांपैकी एक ठरला.

याआधी कधीच कोणत्याही संघानं मायभूमीत हा मान मिळवला नव्हता जे भारतीय संघानं करुन दाखवलं. श्रीलंकेला अंतिम सामन्यात भारतीय संघानं 10 चेंडू आणि 6 गडी राखून मात दिली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *