मेटाने गेल्या महिन्यात लाँच केलेल्या मायक्रोब्लॉगिंग अॅप ‘थ्रेड्स’ला दुसरे अपडेट मिळाले आहे. लेटेस्ट अपडेटसह, अॅपला अनेक नवीन फीचर्स मिळाले आहेत तसेच लेटेस्ट अपडेटमधील काही समस्यांचे निराकरण देखील करण्यात आले आहे. थ्रेड्सचे डेव्हलपर कॅमेरॉन रोथ यांनी iOS साठी लेटेस्ट अॅप अपडेटच्या रोलआउटबद्दल माहिती शेअर केली आहे. इतर प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्मद्वारे प्रदान केलेल्या मुख्य फीचर्समुळे अॅपवरील डेली सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे अपडेट आणत असल्याचं त्यांनी सांगितलं.
अपडेटमधून बदलणार बऱ्याच गोष्टी
रोथ या अपडेटमध्ये जोडल्या जाणार्या नवीन फीचर्सची यादी देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये कंटेट भाषांतरित करण्याची क्षमता, फीडवरील फॉलो टॅब असे बरेच फीचर्स समाविष्ट आहेत. अॅक्टिव्हिटी फीडवर फॉलो टॅब जोडल्यानंतर, वापरकर्ते आता अलीकडेच फॉलो केलेली खाती देखील पाहू शकतील. याव्यतिरिक्त, अपडेटमध्ये अनफॉलो केलेल्या खात्यांसाठी सूचना एनाबेल करण्याची क्षमता देखील दिली गेली आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्ते आता त्यांच्या फॉलोअर्सच्या सूचीमधून थेट इतर अकाउंट्सना फॉलो करु शकतील. प्लॅटफॉर्मवर टॅप करण्यायोग्य रिपोस्टर लेबल देखील जोडले गेले आहेत. इतकेच नाही, या अपडेटने विविध बग फिक्सही आणले असून वापरकर्त्यांना अॅप वापरताणा आणखी भारी अनुभवासाठी बरेच काही केले गेले आहे.
वाचा :Online Scam : जास्त पैसे कमावण्याच्या नादात बसला लाखोंचा गंडा, एक क्लिक आणि खात्यातून ९.३५ लाख गायब