Headlines

IPS कृष्ण प्रकाश यांना आयर्नमॅनचा पुरस्कार : वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवला

सांगली/सुहेल सय्यद 

पोलिस दलातील पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त IPS कृष्ण प्रकाश यांच्या नाव आता ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ नोंदवले गेले. त्यांनी 2017 साली जगातली सर्वात आव्हानात्मक समजली जाणारी ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस’ ही स्पर्धा जिंकली होती. अशी कामगिरी करणारे ते भारतातील पहिलेच पोलीस अधिकारी आहेत. भारतीय सैन्य, निमलष्करी दल किंवा पोलीस सेवेतील हे पहिलेच आहेत ज्यांनी ही कामगिरी केली आहे.

फ्रान्समधील आयर्नमॅन ट्रायथलॉन रेस ही स्पर्धा अत्यंत अवघड अशी आहे. यामध्ये 4 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे असे प्रकार केवळ 16 तासात पूर्ण करायचे असतात.  यामध्ये खूप कमी लोकांनां यश येते. ही स्पर्धा जिंकण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

यावेळी तासगांव चे सामाजिक कार्यकर्ते रुग्णसेवक निसार मुल्ला यांनी कृष्णप्रकाश यांच्या यशाबद्दल यांचा सत्कार केला. व निसार मुल्ला यांनी देखील पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णप्रकाश यांनी यांचा सत्कार केला. व कौतुक करून पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *