Headlines

IPL सुरू होण्याआधीच मोठा धक्का! 22 दिग्गज खेळाडू बाहेर

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामाचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होत आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी मोठी धक्कादायक बातमी आहे. 8 संघांचं मोठं नुकसान झालं आहे. 

आयपीएल सुरू होण्याआधी एक दोन नाही तर तब्बल 22 दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे. या दिग्गज खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे 8 संघांचं मोठं नुकसान झालं. हे खेळाडू कोण आहेत आणि अचानक बाहेर का झाले आणि त्यांचा संघ कोणता जाणून घेऊया.

1. चेन्नई संघ

चेन्नई विरुद्ध कोलकाता पहिला सामना आज होणार आहे. चेन्नई संघातून 3 खेळाडूंनी माघार घेतली आहे. दीपक चाहर, मोईन अली सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत. मोईन अलीला व्हिसा उशीरा मिळाल्यामुळे पहिला सामना चुकला. दीपक चाहर दुखापतीमुळे सध्या बाहेर आहे.

ड्वेन प्रिटोरियस पहिल्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाही. त्यामुळे चेन्नई संघाला मोठा धक्का बसला आहे. 3 खेळाडू पहिल्या सामन्यांना उपलब्ध नसल्याने चेन्नईला मोठं नुकसान होणार आहे. 

2. दिल्ली

डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, एनरिख नॉर्खिया, मुस्तफिजुर रहमान आणि लुंगी एनगिडी सारखे दिग्गज खेळाडू संघातून बाहेर आहेत. त्यामुळे चात्यांची थोडीशी निराशा होऊ शकते.  नॉर्खियाला दुखापत झाली आहे. तर एनगिडी आणि मुस्ताफिजुर पहिल्या सामन्यांसाठी उपलब्ध असणार नाहीत. वॉर्नर 2 तर मार्श 3 सामने खेळणार नाही. 

3. कोलकाता आणि पंजाब

पंजाब किंग्समध्ये कगिसो कबाडा क्वारंटाइनमुळे पहिला सामना खेळणार नाही. तर कोलकाता संघात एरॉन फिंच, पॅट कमिन्स सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत. 

4. बंगळुरू संघ

बंगळुरू संघातील 3 खेळाडू सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत. ग्लॅन मॅक्सवेलनं नुकतंच लग्न केलं आहे. त्यामुळे तो पहिले काही सामने खेळणार नाही. तर जोश हेजलवुड आणि  बेहरेनडॉर्फ सुरुवातीच्या सामन्यांना खेळणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे.

5. लखनऊ संघ

मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर आणि काइल मेयर्स तिन्ही खेळाडू सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत. तर 4 संघाचे चार खेळाडू सुरुवातीचे सामने खेळताना दिसणार नाही. हैदराबादमधून सीन एबट, मुंबईतून सूर्यकुमार यादव तर राजस्थानमधून रासी वॅन डर डुसेन गुजरातमधून अल्जारी जोसेफ सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत.

यामधील काही खेळाडू दुखापतीमुळे तर काही खेळाडू आपल्या देशाच्या दौऱ्यामुळे सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. काही खेळाडू क्वारंटाइनमध्ये असल्याने पहिल्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसतील. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *